? Big Breaking..जवखेडा येथील तलाठी लाच घेतांना रंगेहाथ एसीबी च्या जाळ्यात……
अमळनेर :- तालुक्यातील जवखेडा येथील तलाठ्याला पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून एसीबीच्या पथकाने आज दि. १३ जानेवारी रोजी साडे बारा वाजता अटक केली.
जवखेडा येथील तक्रारदार यांची इंग्लिश मिडीयम स्कूल असून शेतीच्या जागेवर बांधकाम केल्याने तहसीलदारांनी दंड ठोठावला होता. त्यानुसार त्यांनी ३२ हजार ४२६ रुपये दंड भरला होता. तो दंड भरल्याचा रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात आरोपी तलाठी मुकेश सुरेश देसले, रा. सूर्या नगर, धुळे याने १५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार दाखल केल्यानंतर आज १३ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता जवखेडा येथे तलाठी कार्यालयात १५ हजार रुपये घेताना आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले. सदर पथकात डी वाय एस पी गोपाल ठाकुर, पी आय निलेश लोधी, पी आय संजोग बच्छाव, सफौ. रविंद्र माळी, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना. जनार्धन चौधरी, पोकॉ. प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर आदींनी कार्यवाही केली.






