आठवडे बाजाराचा दुसरा टप्पा संपन्न..रविवारी भरला इंदुमाई समोरील रोडवर मोठा बाजार…खाऊ गल्लीचे उद्दाघाटन संपन्न…
अमळनेरकरांचा वाढता प्रतिसाद..
अमळनेर
शहर व तालुक्यातील महिलांसाठी झेप फाउंडेशन अमळनेर व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या तर्फे शहरात पहिल्यांदाच महिला व गृह उद्योजिकांसाठी डॉ रेखा चौधरी यांच्या संकल्पनेतून महिला आठवडा बाजार या उपक्रमाची सुरुवात दि 25 डिसेंबर 2019 रोजी सुरू होऊन अध्यक्षा डॉ रेखा चौधरी यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.या ठिकाणी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूचे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले.
उदघाटना प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरींनी सांगितले की,शहर व तालुक्यातील महिलांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा हाच उद्देश असून
महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयोग आहे.या प्रतिसादा नंतर मोठ्या ग्राउंड मध्ये हे स्टॉल उभारावे लागणार आहे.तर या माध्यमातून या सर्व महिलांनी केलेल्या विविध वस्तुंना इंटरनॅशनल मार्केट मध्ये प्रेझेंटेशन करण्याचं काम देखील होणार आहे मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारणी झाल्यावर मोठमोठ्या व्यापाऱ्यांना इथे आणून मोठी बाजार पेठ या महिलांना उपलब्ध होणार आहे
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात दि 29 रोजी रविवारी इंदुमाई निवासस्थानाच्या समोरील रोड वर आठवडे बाजार भरविण्यात आला.या दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक महिलांना मोठ्या ऑर्डर या दिवशी मिळाल्या असून खाऊ गल्लीचे उद्दघाटन कार्यसम्राट शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रा जयश्री साळुंके,भारती गाला,विजया जैन इ उपस्थित होते.
याठिकाणी नवनवीन खाण्याचे,लहान,मोठ्यांच्या नवीन कपड्यांचे,फिनाईल,सॅनिटरी नॅपकिन,ज्वेलरी,ठेचा भाकर,पातोडीची भाजी भाकरी,पुरण पोळी,येळण्या अशा वस्तू ज्या तालुक्यावरच प्रख्यात होत्या त्यासाठी जर बाजार पेठ उपलब्ध होत आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला चार पैसे मिळत आहेत.
यावेळी अनिल महाजन,बाळासाहेब संदनशिव,धनु महाजन,सुधीर चौधरी,सोनू चौधरी,एस के महाजन, योगेश सर,योगिता खैरनार, सुवर्णा बडगुजर, किशोर मराठे,महेश चौधरी, हेमराज पाटील,मुकेश बडगुजर इ शिरिषदादा मित्र परिवार चे सदस्य उपस्थित होते






