राजवर्धन पाटील यांनी केली नुकसानग्रस्त केळीची पाहणी
प्रतिनिधी दत्ता पारेकर
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी कांदलगांव ता इंदापूर जिल्हा पुणे या गावातील नुकसानग्रस्त केळी बागेस भेट देऊन साखरे कुटुंबाचे सांत्वन केलं. काही अज्ञातांनी या केळी बागेवर विषारी औषधाची फवारणी करुन हातातोंडाशी आलेला घास हिसकवून घेणाचा लाजिरवाणा प्रकार केला होता. शेतकऱ्याला यातून सावरण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राजवर्धन पाटील यांनी सांगितलं. या साखरे कुंटुब व ग्रामस्थ उपस्थित होते






