ग्रामीण भागात खेडो-पाडी रमले जुगार पोलिसांच्या धाकात ऑनलाईन व्यवहार
दिवस रात्र खेळ सुरू
रजनीकांत पाटील
अमळनेर :संपूर्ण देश लॉक झाला असता देखील शहरातून ग्रामीण भागाकडे येणारा नागरिक हा घरात ठरत नसतो रिकामं राहून त्याचे देखील वळण आता चुकत चालले आहे शेवटचा एकच उपाय गावाबाहेर मांडू पत्त्यांचा डाव तालुक्यातील गावोगावी खेडो पाळी असणारे रिकामटेकड्याचं वळण जुगार पत्यांनकडे आता चांगल्याच प्रकारे रमले आहेत चांगल्या च प्रकारे खेडो पाळी पत्ते/ जुगार यांना चालना मिळाली आहे.
संचारबंदी तसेच लॉक डाउन असल्याकारणाने गावात पोलीस प्रशासनाची गाडी फिरकत असते या धाकाने जुगार खेळण्यासाठी दिवसाढवळ्या गावापासून लांब अंतरावर जाऊन आपला डाव मांडत आहे. गावाबाहेरील पटांगण तसेच शेतात यांचा डाव मांडला असतो यात बाहेर गावाहून येणारे मुंबई ,पुणे कर काही होम होम कॉरंटाइन यांचा जास्त समावेश असतो यात बसून खेळला जाणार डाव यावर कुठल्याही पोलीस अथवा अधिकाऱ्याची गाडी आली असता पळ काढायला सहज जमेल या मुळे पैशाचा व्यवहार हा ऑनलाईन अथवा कागदावर टीप मार करून केला जातो.
या बाबत कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत देखील काही नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता 10 ते 15 जण मिळून खेळ रमवतात यात पैसा चा होणार चुराडा तसेच सुरक्षित अंतर न ठेवता खेळला जाणारा खेळ यात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण हाऊ शकतो. या बाबत गावातील पोलीस पाटील तसेच सरपंच यांचा देखील त्यांना धाक उरला नाही.






