Maharashtra

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी श्रेया भोसले

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी श्रेया भोसले

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपूरची कु. श्रेया किरण भोसले यांची निवड झाल्याने सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र राज्यासह देशांमध्ये युवतींसाठी पहिला राजकीय मंच हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविद्यालय तसेच शिक्षण पूर्ण केलेल्या व समाजसेवेत अग्रेसर असलेल्या युवतींची संघटना बांधून सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची शाखा स्थापन करणार आहे. आपल्यावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाडून राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवण्यास मदत करणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील युवतींच्या येणाऱ्या समस्यांचे निराकरण राष्ट्रवादी युवती शाखेच्या माध्यमातून केले जाईल तसेच त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या माध्यमातून प्रसंगी लढाई उभारू व आपल्यावर दिलेल्या जबाबदारीत पात्र ठरू असा विश्वास दैनिक जनमतशी बोलताना कु. श्रेया किरण भोसले यांनी व्यक्त केला. त्यांची निवड राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांनी केली असून तसे पत्रही त्यांना देण्यात आले आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होऊन पक्ष वाढवण्यासाठी अग्रेसर राहू असेही श्रेया भोसले यांनी सांगितले. पंढरपूर शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी महिला अध्यक्ष तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी तिचे अभिनंदन करून तिच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button