विक्की खोकरे यांना डॉ बाबा आमटे समाज सेवक पुरस्कार जाहीर…!
रजनीकांत पाटील
एरंडोल – येथील नेहमी गोरगरीबांचा मदतीला धावून जाणारे आरोग्यदूत युवराज उर्फ विक्की खोकरे यांना वरणगाव येथील आई सावित्री माई फुले बहुउद्देशीय संस्थाच्या वतिने राज्यस्तरीय कर्मयोगी डॉ बाबा आमटे समाज सेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या भयंकर परिस्थितित कोरोना रुग्णांची अवस्था अत्यंत बिकट व दयनीय असुन या कोरोना रुग्णना जवळ न जाता अगदी रक्ताचे नाते असलेली व्यक्ति देखील लांब राहतो मात्र या सर्वाना अपवाद ठरणारे विक्की खोकरे नेहमी त्याचा मदतीला धावून जात असे विशेष म्हणजे विक्की खोकरे हे कोरोनाग्रस्त रुग्णाची मदत करत असतांना ते स्वता कोरोना पॉझिटिव्ह झाले व हिम्मत न हारता त्यांनी कोरोनावर मात करून आपली रुग्णसेवा पुन्हा सुरुच ठेवत कोरोना रुग्णांनाचां आधारवड बनलाय,अशा खऱ्या कोरोना योद्धाचा सन्मान सोहळा 15 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
विक्की खोकरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष रमेश भैया परदेशी, शालिकभाऊ गायकवाड, रमेश अण्णा महाजन, छोटु आबा चौधरी, राजेंद्र आबा चौधरी, किशोरभाऊ निंबाळकर, अमित दादा पाटील,अॅड विलास मोरे, प्रा आर आर पाटील,आदींनी अभिनंदन केले






