Aurangabad

संतपीठाच्या माध्यमातून जीवनमुल्यांचे जतन होईल- कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे प्रतिपादन

संतपीठाच्या माध्यमातून जीवनमुल्यांचे जतन होईल- कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे प्रतिपादन

गणेश ढेंबरे / औरंगाबाद

अनेक धर्मांत प्रबोधनाचे विचार मांडण्यात आलेले आहेत. संतपीठाच्या माध्यमातून जीवनासाठीची आवश्यक मानवी मुल्ये याचे शिक्षण, संशोधन कार्य राबविण्यात येईल, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले. तदर्थ अभ्यास मंडळ स्थापन करुन येत्या सप्टेंबरपासून अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील, असे त्यांनी घोषित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संचलित संत एकनाथ महाराज संतपीठ सुरु करण्यासंदर्भात संवाद बैठकीचे शनिवारी आयेजन करण्यात आले. संतपीठच्या सभागृहात ही बैठक झाली.

यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश करपे, संतपीठ समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते आदींची मंचावर उपस्थिती होती. यावेळी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, संतपीठाचा प्रलंबित प्रश्न यंदाच्या आषाढीच्या पुर्वी मार्गी लागला याचा मनस्वी आनंद होत आहे. संत एकनाथांची कर्मभूमी व संत ज्ञानेश्वरांच्या जन्मभूमीत संतपीठ होत आहे. या ठिकाणी विविध पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येईल. महाराष्ट्रात तीन विद्यापीठे संताच्या नावाने आहेत. संतपीठ देखील आगामी दोन-तीन वर्षात नावारुपाला येईल, असा विश्वास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button