Usmanabad

चोरीच्या ४४ बाईक जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

चोरीच्या ४४ बाईक जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

उस्मानाबाद प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-
उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने उस्मानाबाद मधील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या बाजूस असलेल्या एका घरावर पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी शंकर भरत देवकुळे आणि त्याचा सहकारी अनिल उर्फ विठ्ठल अर्जन मगर दोघे रा. फकिरानगर, उस्मानाबाद यांना ताब्यात घेउन विचारपूस केली असता त्या दोघांच्या ताब्यात असलेल्या पुणे, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून चोरुन आणलेल्या अंदाजे १४,५६,९९०/- रु.किंमतीच्या विविध कंपनीच्या ४४ मोटारसायकली आढळल्या. त्यापैकी ११ मोटारसायकलींचा मूळ चेसी क्रमांक आणि इंजिन क्रमांक पुसून त्यावर इतरत्र वापरात असलेल्या त्याच कंपनी-मॉडेल- मोटारसायकलचा चेसी-इंजीन क्रमांक उमटवून (Debossing) त्याच मोटारसायकलचा नोंदणी
क्रमांक पट्टी लाऊन त्याच मोटारसायकलचे बनावट वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC Book) तयार करण्यात आले आहे. तर उर्वरीत ३३ मोटारसायकलींना बनावट वाहन नोंदणी क्रमांकाची पट्टी लावलेली आहे.

या बाबत पोलीस ठाणे उस्मानाबाद (शहर) गु.र.क्र. ६३/२०२० भा.दं.वि. कलम- ३७९, ४११, ४१३, ४१४, ४६५, ४६८, ४७१, ४७३, ४७४, ४७६, ४८२, ४८५, ४८६, ४२० प्रमाणे पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रमोद थोराद यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरन गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने हे करत आहेत. चालू वर्षातील राज्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक राज रौशन आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, पोलिस निरीक्षक दगूभाई शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button