Pandharpur

लसीकरण च्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नागरिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन..

लसीकरण च्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नागरिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन..

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदे मध्ये आरोग्य आरोग्य समितीची सभा सभापती विवेक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
पंढरपुरा शहरांमध्ये माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियान मोहीम राबविण्यात येत असून यावेळी माझे गाव कोरना मुक्त गाव शपथ घेण्यात आली. या सभेस मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व आरोग्य समिती सदस्य उपस्थित होते. या महत्वपूर्ण मिटिंगमध्ये आरोग्य विभागात करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच पुढे राबण्यात येणाऱ्या अभियाना बाबत चर्चा करण्यात आली.भारतामध्ये १)कोव्हिशील,२)कोव्हॉक्सीन,३)झायकॉकD, ४)स्पुटनीकV, ५)NVX-COV2373 ६)प्रोटीन अँटिजनवर आधारित लस,७)HGCO-19, ८)भारत बायोटेक ची लस ९)ऑरोव्हँक्सीन या ९ लसी क्यिनिकल ट्रायलमध्ये आहेत. पुढील महीन्यात कोव्हीड साठी लसीकरणाला सुरवात होणार असल्याने लसिकरणाच्या पहिल्या टप्यासाठी वैद्यकीय सेवा, आरोग्य विभागा संर्दभातील नागरिक तसेच औषध विक्रेत्यांनी रजीस्ट्रेशन करून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले. काही माहीती हवी असल्यास, अधिक माहीती साठी आरोग्य विभाग किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांचेशी संपर्क करावा असे सांगितले. पंढरपुरातील अधिकारी, कर्मचारी यासंर्दभातील प्रशिक्षण घेत असल्याचे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले. पुढील काही महिन्यामध्ये विवीध टप्यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना लस देण्यात येईल असे सांगितले. नागरिकांनी सहकार्य करावे व शासना कडुन दिलेल्या सुचनेवर व माहीतीवरच विश्वास ठेवावा असे सांगितले. सदर प्रसंगी पंढरपूर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी विवीध बाबींवर चर्चा करण्यात आली. पंढरपुरातील मध्यवर्ती, विवीध ठिकाणी कोरोना चाचणीसाठी कँप राबवूयात असे सुचवले, जनजागृती च्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील कोरोना संदर्भाती भिती दुर करुयात कारण जरी पॉझिटिव्ह अला तरी हजारो नागरिकांनी घरी राहुनच कोरोनावर मात केली आहे तसेच व्यायम, प्राणायाम, योगासन, मेडीटेशन, वॉकिंग, जॉगींग व सायकलींग या सर्व बाबी ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते , रोग प्रतीकारक शक्ती वाढते याबाबत विवीध उपक्रम राबवुयात असे सुचवले व सदर प्रसंगी माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियाना अंतर्गत शपत घेण्यात आली. साथीचे आजार , डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनीया या आजारासाठी चांगल्या प्रकारे यंत्रणा राबवत असल्याचे सभापती परदेशी यांनी सांगितले यापुढेही जनजागृती वर जास्त भर देउन नागरिक व प्रशासन मिळुन या संकटावर मात करु असे सर्व सदस्यांनी सुचवले व माझी वसुंदरा अभियाना राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली.आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे,नागनाथ तोडकर व अनिल अभंगराव यांनी आरोग्य विभाग व स्वच्छतेच्या मोहीमेचा आढावा दिला, हिवताप अधिकारी किरण मंजुळ यांनी साथीच्या आजारा बाबत राबवत असणाऱ्या मोहीमेचा आढावा दिला. वैद्यकीय अधिकारी बजरंग धोत्रे यांनी लसीकरण व वैद्यकीय बाबीं बिषयी माहीती दिली.
सदर मिटिंगमध्ये आरोग्य समिती सदस्य नगरसेवक संजय निंबाळकर, नगरसेविका शकुंतला नडगीरे, अर्चना रानगट, अनुशया शिरसट यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला तर बाळासाहेब कदम यांनी विषयांचे वाचन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button