Amalner

अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय भाईदास पाटील व सचिवपदी नितिन सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड

अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय भाईदास पाटील व सचिवपदी नितिन सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड

रजनीकांत पाटील

अमळनेर – अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेची आज दि १५ रोजी जळगाव जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे मानद अध्यक्ष गुणवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिति सानेगुरुजी सभागृहात जनरल सभा पार पडली त्यात अध्यक्षपदी संजय भाईदास पाटील व सचिवपदी नितिन सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सभेत तालुका मानद अध्यक्षपदी शांतिलाल सोनवणे,कार्याध्यक्षपदी आधार धनगर, कोषाध्यक्षपदी आर.डी.पवार, सह सचिवपदी पंकज पाटील,उपाध्यक्षपदी विलास सोनवणे, महिला उपाध्यक्षा योगिता वसंत पाटील, प्रसिद्धि प्रमुखपदी विलास पाटील, डिगंबर सैंदाणे, सल्लागार म्हणून डी.बी.पाटील, एच.आर.वाघ, बी.वाय.पाटील, संघटकपदी डी.एस.साळूखे, विठ्ठल पाटील, कार्यकारणी सदस्य महेंद्र देसले, प्रांजल वाघ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.सदर बैठकीत ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष व जि.प.कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष दिनेश साळूखे यांचे मार्गदर्शन लाभले तर निवडी बद्दल पंचायत समिती कर्मचारी व ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button