Maharashtra

चांपा येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजनांच्या शिबिराचा शुभारंभ

चांपा येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजनांच्या  शिबिराचा शुभारंभ       
उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना किसान पेन्शन कार्डचे वाटप
किसान मानधन योजनेचा लाभ घ्या;तहसिलदार प्रमोद कदम यांचे शेतकऱ्यांना आवाहन
१८ते ४०वयोगटातील शेतकऱ्यांना मिळणारं लाभ 

चांपा येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजनांच्या शिबिराचा शुभारंभ

चांपा प्रतिनिधी अनिल पवार
प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे. १८ ते ४० वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (एसएमएफ) या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी चांपा ग्रामपंचायत कार्यालय येथे दि.२३, २४ व २५ ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियानचे शुभारंभ करण्यात आले . 

चांपा येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजनांच्या शिबिराचा शुभारंभ
परिसरातील चांपा हळदगाव  , परसोडी , तिखाडी , उमरा, दुधा, पेंढरी , सुकळी , चांपा , मांगली , खापरी , उटी , भिवापुर आदी गावातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला यावेळी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे यांच्या उपस्थितीत शेतकरी गोपाल किसन आदे, चंद्रभान परतेकी , ललिता घोसले आदी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान पेन्शन कार्डचे वाटप करण्यात आले .
यावेळी उमरेडचे तहसिलदार प्रमोद कदम, तालुका  कृषी अधिकारी संजय वाकडे , अतिरिक्त नायब तहसिलदार योगेश शिंदे , नायब तहसिलदार कपिल हाटकर , सरपंच अतिश पवार , मंडळ अधिकारी भुरे ,कृषि सहायक अधिकारी एम के गुजर , चांपा तलाठी प्रियंका अलोने व अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची उद्दीष्ट तीन दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात पुर्ण करण्यात यावे असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले,  पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. 
लाभार्थ्यांचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुध्दा तरतुद या योजनेत आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी चांपा ग्रामपंचायत कार्यालयात २३ ऑगस्ट ते २५ आॅगस्ट २०१९ दरम्यान उमरेड  तालुक्यात  विशेष मोहीम राबविली जाणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन उमरेडचे तहसिलदार प्रमोद कदम यांनी केले आहे.
या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, गांव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणावी. 
नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त संख्येत चांपा परिसरातील शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात सुविधा केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button