Champa

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत चांपा येथे प्लास्टिक निर्मूलनासाठी महाश्रमदान

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत चांपा येथे
प्लास्टिक निर्मूलनासाठी महाश्रमदान

“प्लास्टिक मुक्त उमरेड तालुका करा पर्यावरणाशी नाते जोडा “

अनिल पवार

चांपा, ता २९: स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत उमरेड तालुका प्लास्टिक मुक्त तालुका करण्यासाठी पर्यावरणाशी नाते जोडा , असा संदेश देत उमरेड तालुक्यात प्रथमच चांपा ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्राम स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती अभियानाचे शुभारंभ महाश्रमदानाने करण्यात आले .

प्लास्टिक निर्मूलन अभियानांतर्गत मार्गदर्शन व महाश्रमदान कार्यक्रमात अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हापरिषदचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मा .श्री अरविंद ठाकरे होते .कार्यक्रमाचे उदघाटक उमरेडचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे होते .प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे जलनिरीक्षक अधिकारी मा .श्री अनिल राजेधर, सहाय्यक गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी जयसिंग जाधव , एनआरबीएम बांबू प्रकल्पाचे संचालक यूपकुमार पंचबुदे , होते .कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत उमरेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुभाष सानप , पंचायत समितीचे समूह समन्वयक विनायक भोस्कर , सरपंच अतिश पवार यांच्यासह शासकीय कर्मचाऱ्यांनी व गावांतील नागरिकांनी भव्य लोकसहभागातून महाश्रमदान करून प्लास्टीक निर्मूलनासाठी १०५किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला .

ग्रामपंचायत कार्यालय , आठवडी बाजार , जिल्हापरिषद शाळा , माता बालसंगोपन उपकेंद्रापासून तर संपूर्ण गावात स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जनजागृती करून उमरेड तालुक्यात मोहीमेला सुरवात केली .यावेळी नागपूर जिल्हापरिषदचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मा .श्री अरविंद ठाकरे यांच्याहस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्लास्टिक निर्मूलन विषयावर मार्गदर्शन केले .व तसेच उमरेडचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे व सहायक गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी मार्गदर्शन करतेवेळी सर्व ग्रामस्थांकडून प्लास्टिक निर्मूलनाची शपथ घेण्यात आली .

यावेळी चांप्याचे सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .चांपा गावात एनआरबीएम बांबू प्रकल्पाचे विद्यार्थी , सोबतच विजय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हापरिषद शाळेचे विद्यार्थ्याने गावात प्लास्टिक निर्मूलनासाठी प्रभात फेरी काढण्यात आली .

उमरेडचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे , सहाय्यक गटविकास अधिकारी जयसिंग जाधव , चांप्याचे सरपंच अतिश पवार , नागपूर जि .प .चे पाणी व गुणवत्ता विभागाचे अनिल राजेधर , स्वच्छता मिशन कक्ष समूहचे समन्वयक विनायक भोस्कर , पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुभाष सानप , चांप्याचे ग्रामविकास अधिकारी बी.बी.वैद्य , उपसरपंच अर्चना सिरसाम , ग्रा .प .सदस्य , मीराबाई मसराम , अस्मिता अरतपायरे , सूरज माहूरे , विजय विद्यालयचे राठोड सर , हेमंत तलवारे , जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक येरखेडे , नरेगा विभागाचे कर्मचारी , आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला प्लास्टिक निर्मूलन महाश्रमदानाचे कार्यक्रम यशस्वी पार पडले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button