Pune

आज इंदापुर मध्ये एकाच दिवशी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

आज इंदापुर मध्ये एकाच दिवशी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : एकाच दिवशी इंदापुरात कोरोनाच्या दोन रुग्णांची नोंद झाली. या दोन रुग्णांमुळे इंदापुरात तालुक्यात कोरोनाने आज आठ रूग्ण झाले .

इंदापूर शहरातील कसबा भागातील ३८ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी आज सकाळी पाँझिटीव्ह आली. या महिलेच्या संपर्कातील २१ जणांना क्वारन्टाईन करण्यात आले आहे. असे असतानाच येथील एका बँकेत कर्मचारी असलेला व एका माजी राजकीय पदाधिकाऱ्यांचा मुलगा आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. या रुग्णावर पुण्यातील खासगी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान आज सकाळी पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती आल्यानंतर प्रशासनाने प्रभाग क्रमांक ८ व ६ भागातील तारेची शाळा, जुनी तांबडी शाळा, रयत शाळेच्या पाठीमागील बाजूचा भाग आजपासून सिल केला.

तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी आवाहन केले आहे की, इंदापूर शहरात आज दोन कोरोना पाँझिटीव्ह रूग्ण आढळले असले तरी शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता विनाकारण घराबाहेर न पडता स्वतः ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. नागरिकांनी मास्क, सँनिटायझरचा वापर करावा.

उद्या इंदापुरात जनता कर्फ्यू

दरम्यान रविवारी (ता. १४) इंदापूर शहरात एक दिवस जनता कर्फ्यु होणार आहे. शहरातील व्यापारी, फळ व भाजीपाला विक्रेते व नागरिकांना उद्याचा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन नगराध्यक्षा अंकिता मुकूंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, भरत शहा, नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, विरोधी पक्षनेते पोपटराव शिंदे, गटनेते गजानन गवळी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button