आदिवासी विधवा महिलेस ञास देणार्या आश्रमशाळा मांडवी मुख्याध्यापकास बडतर्फ करा: बिरसा क्रांती दलाची मागणी.
रत्नागिरी: श्रीम. कमल शंकर वळवी स्वयंपाकी ह्या विधवा आदिवासी स्ञीस हेतूपुरस्सर ञास देणारे श्री एस. आर. पावरा मुख्याध्यापक ,शासकीय आश्रम शाळा मांडवी तालुका धडगांव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ सेवेतून बडतर्फ करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी प्रकल्प अधिकारी तळोदा व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीम. कमल शंकर वळवी स्वयंपाकी यांचा बिरसा क्रांती दल संघटनेस दिनांक 03/01/2021 रोजी तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. श्रीम. कमल शंकर वळवी ह्या दिनांक 30 जुलै 2020 पासून सेवानिवृत्त झाल्या आहेत. सदर महिला आदिवासी जमातीच्या असून विधवा आहेत. त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत शासकीय आश्रमशाळा मांडवीचे मुख्याध्यापक श्री. एस.आर.पावरा हे पैशांची (लाचेची) अपेक्षा ठेवून त्यांनी अद्यापही श्रीम. कमल वळवी यांचा सेवानिवृत्ताचा अहवाल जाणीवपूर्वक पाठविलेला नाही. तुम्ही मला पैसे दिल्याशिवाय तुमचा प्रस्ताव मी पाठविणारच नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, तुमचा प्रस्ताव पाठवायला मला वेळ नाही, श्री. वानखेडे सेवानिवृत्त लिपीक यांना पैसे देऊन प्रस्ताव तयार करून घ्या व पाठवून द्या.मी तुमचे काम करणार नाही. असे म्हणत वारंवार पैशांची मागणी करत हेलपाटा घालायला लावत आहेत.सदर मुख्याध्यापक एका विधवा स्ञीच्या असहायतेचा गैरफायदा घेत जाणीवपूर्वक विविध मार्गाने ञास देऊ आर्थिक कोंडी करत ञास देत आहेत. श्रीम. कमल शंकर वळवी ह्या सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना पगार मिळत नाही. तेव्हा त्यांच्या कडून पैशांची मागणी करणे,पैशांची अपेक्षा करणे हे मुख्याध्यापक एस.आर.पावरा यांचे लाजीरवाणे कृत्य आहे. 6-7 महिन्यापासून अजूनही पेन्शनचा प्रस्ताव जाणीवपूर्वक न पाठवणे यातच मुख्याध्यापक एस.आर.पावरा यांचा हलगर्जीपणा व कार्यालयीन कामात अनियमितता स्पष्ट दिसून येते. अशा बेजबाबदार मुख्याध्यापक एस .आर.पावरा यांची चौकशी करून एका विधवा आदिवासी स्ञीस ञास देणाच्या आरोपात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे. व श्रीम.कमल शंकर वळवी सेवानिवृत्त स्वयंपाकी यांचा पेन्शन प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून पेन्शन योजनेचा फायदा देण्यात यावा.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी प्रकल्प अधिकारी तळोदा व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे केली आहे.






