Paranda

नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने सामाजिक बांधीलकीची जोपासना

नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने सामाजिक बांधीलकीची जोपासना

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे दि. २०

कोरोना पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी काळात नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार)यांच्या सहकार्याने परंडा तहसिल या ठिकाणी अन्नधान्य किट्स जमा करणे चालू आहे.

२० एप्रिल २०२० रोजी भैरवनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्था,वीट(करमाळा)१ व कृष्णा ऑटो,परंडा २ असे ३अन्नधान्य किट्स परंडा नायब तहसिलदार पुरवठा अधिकारी गायकवाड यांच्या उपस्थिती मध्ये जमा करण्यात आले. तसेच कोरोना संसर्ग विरोधी लढयात पोलीस अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष नागरिकांनशी संपर्क येतो ही गोष्ट लक्षात घेऊन नेहरु युवा केंद्रासोबत आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी असलेले स्वयंसेवक अनिल डोरले (साई जनरल स्टोअर,परंडा) यांनी परंडा पोलीस स्टेशन येथे १ डझन सॅनिटायझर

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्याकडे सुपूर्त करत सामाजिक बांधिलकी जोपासली.

नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) यांच्या सहकार्याने कोरोना संसर्ग जनजागृती सोबतच सामजिक बांधिलकी जोपासणेचे कार्य सातत्याने चालू आहे.

याप्रसंगी नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) परंडा तालुका समन्वयक रणजीत महादेव पाटील,अनिल डोरले उपस्थित होते.

या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button