Pune

?️ प्रेरणादायी..आदिवासी भागातील पूजा शिवाजी भोईर तहसिलदार पदी निवड.

आदिवासी भागातील
पूजा शिवाजी भोईर तहसिलदार पदी निवड.

पुणे / प्रतिनिधी -दिलीप आंबवणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्या पुजा भोईर यांची तहसिलदार पदी नियुक्ती झाली. त्यांचे मुळ गाव पिंपळगाव जोगा ता.जुन्नर येथील भोईरवाडी मधील पूजा शिवाजी भोईर या आदिवासी भागातील मूलीने तहसिलदार पदाची परीक्षा पास होऊन परिसराचे व आई वडिलांचे नाव उज्ज्वल केले.
मुळ जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील भोईरवाडी मधील पूजा हिचे वडिल शिवाजी रामभाऊ भोईर हे नोकरी निमित्त सांगली येथे स्थायिक असून सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅकेत ते फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.तर पूजा ची आई आशा ह्या गृहीणी आहेत तसेच पूजा ला प्रतिक व ऋतीक हे दोन भाऊ असून प्रतिक ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात एस.वाय.बी.ए चे शिक्षण घेत आहे तर ऋतीक हा सोलापूर येथे बी.एस्सी.अॅग्रीचे शिक्षण घेत आहे.
शिवाजी भोईर यांना शिक्षणाची आवड असल्याने . त्यानी स्वताच खडतर परि स्थितीत शिक्षण पूर्ण केल्यामूळे त्यांनी मुलांच्या शिक्षणाला जास्त महत्व दिले.पूजाने आय.ए.एस.अधिकारी व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.तर पूजाच्या आई आशा भोईर यांनी पूजाच्या अभ्यासाकडे दहावी पासूनच विशेष लक्ष दिले असून आज तीने तहसिलदारपदी नियुक्त झाल्याने माझे स्वप्न पूर्ण केले असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
पूजाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विटा जि.सांगली येथे झाले.तर पदवी चे अवसरी ता.आंबेगाव तर पुण्यात पदवित्तर शिक्षण झाले.राज्य सेवा आयोग परिक्षेची तयारी पूजा ने पुणे युसिटीच्या लायब्रेरी मध्ये दहा ते बारा तासा पेक्षा जास्त वेळ अभ्यास करून केले.पूजा चा दिनक्रम सकाळी सात वाजे पासून लायब्रीत जाऊन अभ्यास सुरु करायचा ते रात्री नऊ ते दहा वाजे पर्यंत तेथेच जेवन नास्टा सर्व तेथेच करत असे.पूजा तहसि लदार पदावरच न थांबता पूढे अभ्यास सुरु ठेवून तीला डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर व्हायचे आहे.
तहसिलदारपदी निवड झाल्या बद्दल पूजा व तीच्या आई वडिलांचा पिंपळगाव जोगा डिंगोरे जिल्हा परिषद गटाचे सदस्य अंकुश आमले, माजी.जि.प.सदस्य बबन तांबे,आदिवासी नेते बुधाजी शिंगाडे,पिंपळगाव जोगाच्या सरपंच शितल भोईर,उपसरपंच दादासाहेब हांडे,भगवान हांडे,नवनाथ सुकाळे,पंकज हांडे,माऊली सस्ते,दिलीप कदम,निलेश हांडे,राहुल सुकाळे,सुरेश हांडे,अजित घाडगे,सुरेश भोईर,गणेश शिरसाठ यांनी व इतरांनी भोईरवाडी येथील त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करुन सत्कार केला.तर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी फोनवर पूजा चे अभिनंदन केले. बिरसा क्रांती दल पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी दुरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button