गद्दारांची होणार झाडा झडती..
कार्यसम्राट शिरिषदादा चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…
अमळनेर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिरीष चौधरी यांना निवडून आणण्यात कसूर करणारे गद्दार कोण? याचा अहवाल मागवला जाईल आणि दोषी असलेल्यांना निश्चित जागा दाखवली जाईल; असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरीष चौधरी यांना पक्षाकडून हवे ते सगळे बळ पुरवले जाईल आणि अमळनेर विधानसभा मतदार संघात शिरीष चौधरी यांचे नेतृत्व आधी पेक्षा जास्त ताकदीने उभे केले जाईल अशी ग्वाही शिरीष चौधरी यांना दिली.
अमळनेर विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी तर्फे शिरीष चौधरी यांनी उमेदवारी केली होती. परंतु अगदी थोड्या मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. 85000 इतके मतदान करणाऱ्या मतदारांना सुद्धा या निकालामुळे धक्का बसला असून पक्षातील शिरीष चौधरी यांच्या हितशत्रूंनी केलेली गद्दारी आणि विरोधी उमेदवाराने केलेले जातीपातीचे राजकारण यामुळे शिरिष चौधरी यांना अपयश आल्याचे स्पष्ट दिसले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर माजी आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू उद्योगपती डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेअंती मुख्यमंत्रीी देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्याचे कौतुक केले आणी म्हणाले; “तुमच्या कार्यावर विश्वास ठेवून भाजपाला 85000 मतदान देणाऱ्या एकाही मतदाराच्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही. तुम्हाला हवे ते सर्व बळ पक्ष देत राहील आणि तुम्हाला पक्षाच्या प्रमुख प्रवाहात आणले जाईल.” ज्यांनी या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केली त्या सर्वांना पक्ष जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही आणि पदे देऊन मोठे केलेल्या अशा लोकांना पक्ष संपवल्या शिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.






