शिरूड येथील दलितवस्ती सुधार योजनेच्या शौचालयाची झाली दुरावस्था
रजनीकांत पाटील
हिंदुस्थानचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी वारंवार भारतवासीयांना आवाहान केले की शौचालय बांधा आणी त्याचा वापर करा. गावोगावी सार्वजनिक शौचालय बांधा व वापर करा. या आवाहानाच्या विपरीत परिस्थिती शिरुड येथे आहे.
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत महिलांसाठी बांधलेल्या शौचालयाची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली आहे.
आजूबाजुला प्रचंड प्रमाणात गवत व काटेरी झाडे झुडपे असून चोहोबाजुंनी घाणीचे साम्राज्य असल्याने दुर्गंधी पसरली आहे. लाईट व पाणी देखील नसल्याने त्याची दुरावस्था झाली आहे. शौचालय म्हणजे फक्त एक देखावा असल्याचे दिसत आहे आजुबाजुच्या महिला शौचालयासाठी उघड्यावर बसत असल्याने त्या परीसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने रहिवासी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचातीने तेथे लाईट पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करावी ग्रामस्थांकडुन मागणी जोर धरु लागली आहे.






