Amalner

अमळनेर: शेतकीसंघात वृक्षतोड..!सत्ता येताच “माल””मत्तेचा” गैरउपयोग..! अशासकीय प्रशासक मंडळाचा हात? चोर सोडून संन्याशाला शिक्षा..! न प च्या वतीने गुन्हा दाखल..!

अमळनेर: शेतकीसंघात वृक्षतोड..! अशासकीय प्रशासक मंडळाचा हात? चोर सोडून संन्याशाला शिक्षा..! न प च्या वतीने गुन्हा दाखल..!

नगरपालिकेच्या वतीने संशयित आरीफ पठाण विरूद्ध गुन्हा दाखल

अमळनेर येथील शेतकरी सहकारी संघाच्या धुळे रोडवरील जीन परिसरात लावण्यात आलेल्या डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे. याप्रकरणी आरिफ पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक शेतकी संघाने संबंधित प्रकारात संबंधित चोरट्यावर गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र नगरपालिकेने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या वृक्षतोडीत शेतकरी सहकारी संघाच्या अशासकीय प्रशासक मंडळांचा हात आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. सत्तेत येताच माल आणि मत्ता यांचा गैरवापर सुरू झाला असल्याची चर्चा सुरू आहे. आताच काही दिवसांपूर्वी प्रशासकीय मंडळांने शेतकी संघाच्या कार्यकारिणीने कारभार हाती घेतला आहे. त्यामुळे सत्तेत येताच कत्तल सुरू केली का ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत आपला खुलासा मांडणे आवश्यक आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा, झाडे जगवा, शतकोटी वृक्ष लागवड आदी अनेक योजना व उपक्रम शासन, प्रशासन स्तरावरून राबविल्या जात आहेत. मात्र, या योजना केवळ फोटोसेशनपुरत्या मर्यादीत असून त्याच त्या खंड्डयांमध्ये दरवर्षी झाडे लावली जातात, हे वास्तव. असो. वृक्ष चळवळीसाठी शासन, प्रशासन, अनेक स्वंयसेवी संस्था व पर्यावरण प्रेमींनी कंबर कसली आहे. यायोजनेवर दरवर्षी करोडो रूपये खर्ची पडत असतात.
तर दुसरीकडे जी झाडे आपोआप वाढलेली आहेत ती सुद्धा काहींना सहन होत नाही. पर्यावरणाचा र्‍हास करून पैसे कमविण्यासाठी अनेकजण ही झाडे विकतात तर काही परस्पर कापतात. याचाच प्रत्यय शहरात आला असून शेतकरी सहकारी संघाच्या धुळे रस्त्यावरील जीन परिसरात लावलेले झाड कापून त्याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे.
नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी भ्रमणध्वनीवरून येथील वृक्षतोडीबाबत माहिती देत खातरजमा करण्यास सांगितले. अग्रवाल यांना घटनास्थळी आरीफ खा युसुफ खा पठाण रा.कसाली मोहल्ला हा विना परवाना वारूळाचे झाड कापुन घेवुन जातांना दिसला. याबाबत विचारपूस केली असता त्याने उत्तर न देता लाकडाने भरलेला ट्रक्टर घटनास्थळावरून पळवून नेला.
याबाबत अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधिताविरूद्ध अमळनेर शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 379, सहकलम महाराष्ट्र झाडे तोड अधिनियम 1964 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास बापू साळुंखे हे करीत आहेत.

6 हजारात झाड विकले..?

संबंधित लाकूड चोरट्याशी शेतकरी सहकारी संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशासक आणि सचिव यांनी 6 हजार रूपयांमध्ये डील करून वृक्ष तोडून नेण्याबाबत सांगितल्याची चर्चा होत आहे. यामुळे नुकत्याच पदग्रहण करणार्‍या अशासकीय प्रशासकीय मंडळाची नाचक्की होत आहे. याबाबत प्रशासकीय मंडळाने आपली भूमिका शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींसमोर मांडणे आवश्यक आहे.

लाकूडचोर शेतकी संघांचा विकास करतील का…?

शेतकरी सहकारी संघ निवडणुकीस अपात्र आहे. त्यामुळे येथे प्रशासक बसणार होता. मात्र, संघाच्या सर्वांगीण उत्थानासाठी त.क. भूमिपूत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अशासकीय प्रशासकीय मंडळ बसविले. या मंडळाचा दिमाखदार पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. शेतकी संघाला गतवैभव प्राप्त करून देण्या साठी कटिबद्ध असलेल्या लोकांनी चारच दिवसात संघाचे डेरेदार झाडच विक्रीला काढले अश्या लाकूडचोरांकडून संघांच्या सर्वांगीण उत्थानाची काय ती अपेक्षा ठेवावी. दूध का दूध पाणी का पाणी करावे व दोषी आढळल्यास सचिव, मुख्य प्रशासकाच्या ढुंगणावर लाथा माराव्यात व बदनामी टाळावी.अशी जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button