?अमळनेर शहरातील रस्त्यांची चाळण… प्रशासन झोपेचं सोंग घेऊन
कुंभकर्णाच्या भूमिकेत..!
अमळनेर रा.मा.15 चे काम सुरू होते त्यामूळे शहरातून जाणारा रा.मा 06 (प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुला पर्यंत) रस्त्यावरून सर्व अवजड वाहतूक वळविल्याने रा.मा 06 ची संपुर्ण झाली चाळण..
रजनीकांत पाटील अमळनेर
अमळनेर : अमळनेर रा.मा.15 चे काम सुरू होते त्यामूळे शहरातून जाणारा रा.मा 06 (प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुला पर्यंत) रस्त्यावरून सर्व अवजड वाहतूक वळविल्याने रा.मा 06 ची संपुर्ण चाळण झाली आहे.विशेष करून सुभाष चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल पर्यँत धुळीचे वातावरण होऊन प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रासाचा तक्रारीत वाढ झाल्याचे समजते.त्यास अनुसरून मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी व तरुण मित्र परिवाराने दि.१/१२/२०२० रोजी मा.कार्यकारी अभियंता सार्व.बांधकाम विभाग व मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना निवेदन देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी केली होती. प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने दि.०४/१२/२०२० रोजी तरुण मित्र परिवार रास्ता रोको करणार असल्याचे जाहीर केले होते. शहरात एकमेव रस्ता सुरू असल्याने रस्ता रोको केल्यास मोठी गैरसोय होईल व परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव साहेब व मा पोलीस निरीक्षक श्री आंबदासजी मोरे साहेब यांनी तूर्त आंदोलन करू नये म्हणून मध्यस्ती करत नगरपरिषदेस योग्य मार्ग काढण्यासाठी आव्हान केले होते त्यास अनुसरून मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांना मुख्यधिकारी सौ.विद्या गायकवाड यांनी येत्या ०४ दिवसात सदर रस्त्याची पाहणी करून डागडुजी करण्याचे आश्वासन दिले होते .तरी दि.१०/०१/२०२० रोजी पर्यंत कुठलीही प्रगती न झाल्याने व आम्हाला दिलेल्या अश्वसनाची पुर्तता न केल्याने प्रशासनाचा निषेध करत आहोत.
तर सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे पंकज चौधरी यांनी घोषित केले आहे.त्यामुळे नगरपरिषदेचा समोर व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ढेकू रोड येथील कार्यालय समोर प्रशासनाचा निषेध करत काळे झेंडे व कुंभकरणाची झोप घेतलेले व्यंग चित्राचे फलक तरुण कार्यकर्त्यांनी लावले आहेत.
त्यास अनुसरन आज काळे फटके घालून प्रशासनाचा दिरंगाई व हेतूपुरस्कर दुर्लक्ष बाबत मुख्याधिकारीना निवेदन देत तरुणांनी नाराजी व्यक्त केली. मा. मुख्याधिकारीनी सदर रस्त्याचा कामास मा जिल्हाधिकारी यांच्या कडुन मंजुरी मिळाली असून तांत्रिक अडचण मुळे वेळ लागत आहे.तरी तात्पुरती गैरसोय दूर व्हावी म्हणून डांबरीकरणाचे पँच (खड्डे बुजवणे) साठी 8 दिवसाचा आत काम करून देते असे आश्वासन दिले आहे.तरी येत्या 8 दिवसाचा आत डागडुजी (खड्डे बुजवणे) करण्यातच येईल असा विश्वास मा.आमदार कृषिभूषण साहेबराव दादा पाटील यांचा समक्ष मुख्याधिकारी यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी व तरुण मित्र परिवारास दिला प्रसंगी बाळासाहेब संदानशिव ,हरिश्चंद्र पाटील, किरणभाऊ बागुल, पराग चौधरी, गणेश पाटील,शंकर देसले, ब्रिजलाल पाटील,प्रवीण विसपुते, सुनील चौधरी,प्रशांत पाटील,चेतनआबा पाटील,रुणाल पाटील, जयेश चौधरी , सोनू ढिवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.






