श्री आर्य चाणक्य पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन शाखा हुपरी येथे उत्साहात साजरा.
कोल्हापूर(तुकाराम पाटील प्रतिनिधी)
रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या आणि जिल्ह्यातील 7 शाखांच्या माध्यमातून अल्पावधीतच ११0 कोटीच्या ठेवींचा टप्पा यशस्वीपणे पार केलेल्या श्री आर्य चाणक्य पतसंस्थेचा 2५ वा वर्धापनदिन सोमवार दि. १४ रोजी शाखा हुपरी येथे मोठया उत्साहात व अनेक मान्यवरांच्या उदंड प्रतिसादाने संपन्न झाला.स. ९ वा. संस्थेचे हुपरी शाखा सल्लागार सौ व श्री डॉ. विनायक मेथे या उभायन्तांचे हस्ते श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली ४ वर्षापूर्वी हुपरी येथे नव्याने शाखा सुरु करुन आजअखेर अनेक ग्राहकांना विनम्र , तत्पर व समाधानकारक सेवा देउन संस्थेने चांगला नावलौकिक प्राप्त केला आहे. ठेवीचे आकर्षक व्याजदर व विविध ठेव योजनेच्या माध्यमातुन ठेवी जमा करण्याबरोबरच शाखेने हुपरी व शेजारील गावांमध्ये पाच कोटी रुपयांचे कर्जवाटप देखील केलेले आहे. गृह कर्जासाठी 11% व वाहन कर्जासाठी 10 % इतक्या अल्प व्याजदरामध्ये कर्ज-सुविधा उपलब्ध् करुन दिल्यामुळे अनेक ग्राहक संस्थेशी जोडले जात आहेत. प्रत्येक कर्ज योजनेला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळेच संस्थेने वैद्यकीय क्षेत्रात देखील नवीन कर्ज योजना सुरु करून डॉक्टरां साठी रु. १ लाखापासून 5 लाखापर्यंत विनातारणी कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला . या योजनेचा लाभ वैद्यकीय क्षेत्रातील जास्तीस जास्त ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन करणेत आले आहे.
निवडणूक प्रचाराच्या रन-धुमाळीमध्ये सुद्धा वर्धापनदिन कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी हुपरी रेंदाळ इ परिसरातील लोकांची संख्या कौतुकास्पद होती ज्यामध्ये प्रामुख्याने श्री राजेश मोरबाळे, सुभाष एकांडे, सरदार जमादार, राणोजी ठोंबरे , शाहू म्हेत्रे, शिवाजी गावडे , प्रकाश पाटील, मुख्याध्यापक दिलीप कोळीकर, श्री जाधव , श्री कोरे , विश्वनाथ पाटील प्रतिनीधी बाळासो चोपडे आदीसह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक , ठेवीदार , सभासद भागातील अनेक बँका व पतसंस्थेचे पदाधिकारी , पत्रकार बंधु,छोटे व्यापारी आवर्जुन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत आर्य चाणक्य पतसंस्थेच्या हुपरी शाखेचे पालक संचालक शांतीनांथ शिरगावे व पंडितराव ढवळे व मान्यवरांचे शुभहस्ते करणेत आले. त्याचबरोबर हुपरी शाखा सल्लागार सदस्य अरुण गाट , सुदर्शन खाडे ॲड. एम. टी. देसाई , डॉ दिपक सोलनकर डॉ विनायक मेथे व शिवाजीराव घोरपडे यांनी स्वागत केले. तर पतसंस्थेच्या हुपरी शाखेचे शाखाधिकारी नितीन उर्फ दादासो शिंदे , क्लार्क महेश हळदे , अनिल घाटगे ,प्रविण कोळी यांनी अतिशय शिस्तबघ्द कार्यक्रमाची रचना केली.






