Amalner

Amalner: सावधान..!दुकान उशिरापर्यंत सुरू ठेवले तर होणार कार्यवाही..! 10  दुकानदारांना बेला दंडाचा फटका..!

Amalner: सावधान..!दुकान उशिरापर्यंत सुरू ठेवले तर होणार कार्यवाही..! 10 दुकानदारांना बेला दंडाचा फटका..!

अमळनेर शहरातील रात्री उशिरा पर्यंत दुकान सुरू ठेवणाऱ्या 10दुकानदारांना कारवाईचा फटका बसला आहे. पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे यांनी केलेल्या कारवाईत रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडे ठेवणाऱ्या 10 जणांना अमळनेर न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला. त्यामुळे शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी विविध गुन्हे तपास आणि कडक शिस्त यामुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी आणखी एक उपक्रम आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हाती घेतला आहे. त्यामुळे शहरात चौकांतील रात्रीच्या टवाळखोरांवर देखील वचक निर्माण होणार. जे लोक रात्री 10 वाजेनंतरही आपआपली दुकाने, हॉटेल्स, हातगाडी चालू ठेवतात,त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून उपनिरीक्षक अक्षदा इंगळे यांनी गस्त घालत रात्री उशिरा दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाइचा बडगा उगारला आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत मंगळवारी अमळनेर कोर्टात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 (W) च्या 10 केसेसमधे सुनावणी होवून निकाल देण्यात आला. प्रत्येकी 500 रुपये दंडप्रमाणे एकूण 5000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

रात्री 10 वाजेच्यानंतर आस्थापना बंदची कारवाई रोज करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोणीही रात्री घोळक्याने चौकांत व रस्त्यावर विनाकारण थांबू नये, सर्वांनी नियम पाळावेत असा इशारा वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button