Chimur

ग्रामपंचायत निवडणूक तोडावर असतांना मतदार यादीतील घोळ कायम.. पंधरा- शून्य साठी सत्ताधारी पक्षाची खटाटोप

ग्रामपंचायत निवडणूक तोडावर असतांना मतदार यादीतील घोळ कायम.. पंधरा- शून्य साठी सत्ताधारी पक्षाची खटाटोप

चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शंकरपूर ग्रामपंचायत निवडणूक तोडावर असतांना सुद्धा येथील मतदार यादीतील घोळ कायम आहे. हेतू पुरस्पर सत्ताधारी पक्षाने आपल्या मर्जीतील मतदाराची नावे आपल्या फायद्यासाठी एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्टी केल्याचा आरोप विरोधी गटाकडून होत आहे…
सत्ताधारी पक्षाचे मागील निवडणूकमध्ये पंधरा पैकी बारा ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते परंतु प्रभाग क्रमाक एक हा विरोधी गटाचा बालेकिल्ला असल्याने अजून पर्यंत प्रभाग क्रमाक एक मध्ये सताधारी पक्षाला अजून पर्यत एकदा ही खाते खोलता आलेले नाही आहे…
त्यासाठी संमधित कर्मचारी यांना हाताशी धरून इतर प्रभागातील आपल्या मर्जीतील हक्काच्या मतदाराची नावे प्रभाग क्रमाक एक मध्ये समाविष्ट करण्याचा खटाटोप कायम असल्याचे दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि या संदर्भात माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण चौधरी यांनी पहिल्या यादीवर सात डिसेंबरला तक्रार केल्यानंतर यावर दि. ८ डिसेंबर ला शंकरपूर ग्रामपंचायत मध्ये मतदार यादीचे वाचन झाले. त्याची सुधारित यादी १४ डिसेंबर ला प्रकाशित झाली. यात ज्या ६८६ नावावर आक्षेत घेण्यात आला होता त्यातील काही नावे दुरस्ती करण्यात आली होती. परंतु पुन्हा त्यात नवीन नावे चुकीची नव्याने टाकण्यात आली होती. त्यावर हि पुन्हा आक्षेप घेत दि. २१ डिसेंबर ला नारायण चौधरी यांनी परत तक्रार दाखल केली यावर २२ डिसेंबर ला वाचन करून दुरुस्तीची पुरवणी यादी लावण्यात आली. परंतु त्याही पुरवाणी यादीत पुन्हा नवा घोळ करून ठेवला. विशेष म्हणजे ग्रा. प. माजी उपसरपंचा सविता चौधरी व त्याचा मुलगा ह्या मुळ प्रभाग क्र. ५ मध्ये मतदान आहे. त्यानुसार त्यांचे प्रभाग क्र. ५ च्या पहिल्या मुळ प्रारूप मतदार यादीमध्ये नाव होते. ८ तारखेला झालेल्या आक्षेपा नंतर त्यांचा नावावर आक्षेप नसतांना सुद्धा बुद्धी पुरस्पर प्रभाग क्र. १ मध्ये आपल्या उमेदवाराचे मतदान वाढवण्यासाठी संमधित कर्मचार्यासोबत संगमात करून आणखी आपल्या मर्जीतील २५ नावे समाविष्ट करण्यात आले. यावर २२ तारखेच्या आक्षेपा नंतर संपूर्ण नावे परत प्रभाग क्र. ५ मध्ये टाकून यादी दुरस्त करण्यात आली परंतु परत त्यातही घोळ करण्यात आला. त्यात दुरस्त केलेल्या आक्षेपार्त नावा ऐवजी प्रभाग क्र. ५ मधील १४ मतदाराची नावे, प्रभाग क्र ४ माधिल २५, तर प्रभाग क्र. २ मधील १ व प्रभाग क्र. ३ मधील २ मतदाराची नावे अशी ४२ नवीन आपल्या मर्जीतील नवीन मतदाराची नावे दुसऱ्या अंतिम यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली. यात विशेष म्हणजे सद्धा ग्रा. पं. सदस्य च्या निवडनुकीसाठी उभ्या असलेल्या एका सदस्याच्या कुटुंबातील २६ नावे प प्रभाग क्र. ४ मधून प्रभाग क्र. १ मधील आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रभाग क्र. १ मध्ये टाकण्यात आला आहे.
पंधरा- शून्य साठी सत्ताधारी पक्षाने संमधित कर्मचारी यांना हाताशी धरून इतर प्रभागातील नावाची अदलाबदल करून घोळ निर्माण करून ठेवलेला आहे याबाबत मा. तहसीलदार व उपविभागीय यांचाकडे तक्रार दाखल केली आहे, निवडणूक पूर्वी मतदाराची यादी दुरस्त न झाल्यास व संमधित कर्मचार्यावर योग्य कारवाही न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा विरोधी जनशक्ती परिवर्तन गटांनी दिला आहे…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button