पडघा येथे राबिविला ‘एक पणती सैनिकांसाठी’ उपक्रम
भिवंडी प्रतिनिधी
मिलिंद जाधव
आपल्या देशाचं आणि देशातील नागरिकांच शत्रु पासुन रक्षण करायचं काम आपले शूर जवान २४ तास ३६५ दिवस करत असतात. तर अशा आपल्या सैनिकांना दिर्घायुष्य लाभाव म्हणून दरवर्षी प्रमाणे दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘दिवाळी’ च्या पहिल्या दिवशी भिवंडी तालुक्यातील कला व वाणिज्य महाविद्यालय पडघा, राष्ट्रीय सेवा योजना आणि विवेकानंद प्रतिष्ठान पडघा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पणती सैनिकांसाठी’ हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता पडघा येथील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. उदय मुंडले प्रा. अरुण कासार, कार्यक्रम अधिकारी दीपक पोंक्षे, मंदार कवटेकर, पत्रकार राजेश दळवी व विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या देशाचे रक्षण करण्यात सैनिक अहोरात्र सज्ज असतात. तर काहींनी आपल्या देशासाठी आपले प्राण दिले त्यांच्या आठवणींना उजाळा यावेळी डॉ. उदय मुंडले यांनी दिला. ‘एक पणती सैनिकांसाठी’ या उपक्रमाचे यंदाचे ५ वर्षे असून विद्यार्थी व शिक्षक मिळून हा उपक्रम आम्ही दरवर्षी यापुढेही राबवू असे पडघा कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा.अरुण कासार व कार्यक्रम अधिकारी दीपक पोंक्षे यांनी बोलतांना बोलतांना सांगितले.
सैनिकांच्या आठवणीत शिक्षकांनी,पाहुण्यांनी व विद्यार्थ्यांनी ‘पणती’ पेटवून यावेळी आदरांजली वाहिली.यावेळी डॉ. उदय मुंडले प्रा. अरुण कासार, कार्यक्रम अधिकारी दीपक पोंक्षे , मंदार कवटेकर, पत्रकार राजेश दळवी, पडघा कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व पडघा येथील नागरिक उपस्थित होते.






