भिवंडी

ग्रामीण भागातील  युवा कवी,पत्रकार मिलिंद जाधव  यांना राष्ट्रीय ”युवारत्न” पुरस्कार जाहीर 

ग्रामीण भागातील युवा कवी,पत्रकार मिलिंद जाधव यांना राष्ट्रीय ”युवारत्न” पुरस्कार जाहीर

भिवंडी प्रतिनिधी

सरदार रणजितसिंग सचदेव फाउंडेशन, मुंबई व साईमोह बहूउद्देशीय प्रतिष्ठान, शिर्डी यांच्या वतीने युवा कवी मिलिंद जाधव यांना नुकताच राष्टीय ‘युवारत्न’ २०१९ पुरस्कार जाहीर झाला आहे.

संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील प्रतिभावंताना, उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येत असून यावर्षी युवा कवी मिलिंद जाधव यांना देखील हा मान मिळाला आहे.

युवा कवी मिलिंद जाधव हे भिवंडी तालुक्यातील समतानगर, पडघा येथे राहत असून ते विविध विषयावर उत्तम कविता लिहतात व प्रबोधन करीत असतात. त्यांचा सामाजिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध कवी, साहित्य संमेलनात त्याचा सहभाग असून विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता देखील वर्तमापत्रातून प्रकाशित केल्या आहेत. एवढंच नव्हे तर, अष्टपैलू व्यक्तित्वामुळे एक युवा कवी म्हणून त्यांची ओळख आज इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. अनेक कार्यक्रमात ते सूत्रसंचालनाची धुरा सुध्दा सांभाळत असतात. तर महाराष्ट्र शासन ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात अधिकृत पत्रकार म्हणून अनु क्रमांक २७७ वर मिलिंद जाधव यांची नोंद आहे. अनेक वर्तमानपत्र गेल्या अनेक वर्षांपासून ते उत्तम काम करीत आहेत. म्हणून त्याच्या कार्याची दखल घेऊन रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०१९ रोजी साई निम ट्री हॉटेल रुई शिव रोड नाशिक येथे दुपारी १ वाजता सरदार रणजितसिंग सचदेव फाउंडेशन, मुंबई व साईमोह बहूउद्देशीय प्रतिष्ठान, शिर्डी यांच्या वतीने १२ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात युवा कवी मिलिंद जाधव यांना राष्ट्रीय “युवारत्न” पुरस्काराने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल जेष्ठ साहित्यिक प्रा.दामोदर मोरे

जेष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, डॉ. विठ्ठल शिंदे, अँड. श्रीकृष्ण टोबरे, जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, राजरत्न राजगुरु,अँड प्रज्ञेश सोनावणे, पत्रकार संतोष चव्हाण, नितिन पंडित, भगवान चंदे, समाज विकास मंडळ समतानगर, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांनी त्यांचे अभिनंदन केले असून विविध ठिकाणाहून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button