भिवंडी

१६ वर्षीय सलोनी तोडकरी  बालभिकारी मुक्त भारतासाठी करणार आज  पासून तीन दिवसीय उपोषण!

१६ वर्षीय सलोनी तोडकरी बालभिकारी मुक्त भारतासाठी करणार आज पासून तीन दिवसीय उपोषण!

भिवंडी प्रतिनिधी

मिलिंद जाधव

चिरंजीवी संघटना जिज्ञासू बालकांची बाल अधिकारी संघटना असून बालकांच्या हक्कासाठी तत्परतेने लढा देत असते ,भारतात ,महाराष्ट्रात बालभीकरांनीचे प्रमाण वाढत चालले आहे ,लहान लहान चिमुरडी मूळ रस्त्यावर सिग्नल वर भीक मागताना आढळतात ह्या मुलांचे भविष्य संपुष्टात आलेले असते.भारत हा तरुणांचा देश जरी असला तरी भावी काळात तरुण होणारी हीच लहान पिढी आहे आणि त्या लहान पिढी च्या हातात पाटी ऐवजी वाटी असेल तर मात्र भारताचे भविष्य रस्त्यावर आहे ,धोक्यात आहे ,ह्या बालभीकरींच्या भविष्याचे काय? असा खणखणी प्रश्न चिरंजीवी संघटनेच्या सलोनी तोडकरी विचारतात. ह्या बालभीकारींच्या शिक्षणाची तसेच पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने घ्यावी व भारत बालभीकारी मुक्त ह्यावा म्हणून सरकारच्या डोळ्यावरची झापड काढ नऊ काढण्याकरिता चिरंजीवी संघटनेच्या अध्यक्षा सोळा वर्षीय सलोनी तोडकरी दिनांक 24,25,26 डिसेंम्बर रोजी भिवंडी तालुक्यातील

मैत्रकुल जीवन विकास केंद्र ,शांतीभवन,देवरुंग पाडा ,बापगाव येथे उपोषण करणार आहेत. तसेच दर सोमवारी गावोगावी जात एक दिवसीय उपोषण करणार आहेत! अशी माहिती चिरंजीवी संघटनेच्या राज्य कार्यवाह राहुल भट यांनी दिली.

मोठया संख्येने पाठिंबा देऊन आम्हा लहान लहान हाताचे बळ वाढवावे असे कार्यक्रमप्रमुख चेतन पाटील यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button