Yawatmal

सिंगद भीलवाडी च्या जंगलात निवस्त्र अवस्थेत महिलेचा निर्गुण हत्या घटनेने परिसरात एकच खळबळ

सिंगद भीलवाडी च्या जंगलात निवस्त्र अवस्थेत महिलेचा निर्गुण हत्या घटनेने परिसरात एकच खळबळ

विशाल मासुरकर

यवतमाळ जिल्ह्यातीलदिग्रस पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिलवाडी सिंगद जंगलात अज्ञात महिलेची हत्या करून महिलेचे निवस्त्र अवस्थेत शीर व धड वेगळे करून हत्या केल्याच्या घटनेमुळे नरबळी की हत्या अशा विविध चर्चां परिसरात बोलल्या जाता आहे।

– यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिंगद भिलवाडी च्या जंगलात असलेल्या एका देवाच्या ओट्यावर एका अंदाजे ३६ वर्षीय अनोळखी महिलेची निर्घृणपणे हत्या करून शीर गायब करून मृतदेह फेकून दिल्याची थरारक घटना बुधवार दि.१५ जानेवारी सकाळी 9:३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच तात्काळ घटनास्थळी दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल,पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, गुन्हे शाखा पुसदचे निरीक्षक नीलेश शेळके ,पुसद ग्रामीण चे पोलीस निरीक्षक चोबे,पुसद वसंतनगर चे पोलीस निरीक्षक परदेशी,दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, सह पोलीस ताफा घटनास्थळी पोहचले.

घटनास्थळावर असलेल्या देवाच्या ओट्यावर रक्ताचे डाग , ३ दात ,टाचपिन,कानातील डुल व तुटून पडलेल्या हिरव्या रंगाचा बांगडया व खोलदरीच्या भागात अनोळखी महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत शीर नसलेले शरीराचे धड व उजव्या हातावर गोंदलेल्या ठिकाणावरील मास अज्ञात आरोपीने काढून पुरावा नष्ट केल्याचे बाब पोलिसांना घटनास्थळी निदर्शनास आले.त्यावरून पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने हत्या झालेल्या अज्ञात महिलेच्या शिराची व इतर वस्तूची पाहणी करण्यात आली. परंतु अनोळखी हत्या झालेल्या महिलेचे शीर आढळले नसल्याने वैद्यकीय तपासणीसाठी शीर नसलेले महिलेचे धड दिग्रस ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.अनोळखी महिला ही अंदाजे ३६ वयोगटातील असल्याचा अंदाज वर्तविण्यत येत आहे.

घडलेली घटना ही अनैतिक संबंधातून हत्या की अंधश्रद्धा बळी ? अशी उलट सुलट चर्चा परिसरात सुरू आहे . दिग्रस पोलिसांनी या बाबत हत्या व पुरावे नष्ट केल्या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम ३०२, २०१ नुसार गुन्ह्याची नोंद करून तपास चक्रे फिरविणे सुरू केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button