Dhule

धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यांचेच घर असुरक्षित; पोलिस अधिकाऱ्याच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ..

धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यांचेच घर असुरक्षित; पोलिस अधिकाऱ्याच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ..

प्रतिनिधी : असद खाटीक धुळे


धुळे : धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढताना बघावयास मिळत आहे .चोरट्यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या घरात घुसून तब्बल 22 तोळे सोन चोरून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 22 तोळे सोने चोरून पोबारा केला आहे.

आनंद कोकरे हे दोन दिवसांच्या रजेवर काही कामानिमित्त बाहेरगावी आपल्या फॅमिलीसह गेले असता ही चोरी झाली आहे
घरी परतल्यानंतर कोकरे यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले त्यानंतर घरात पाहणी केली असता घरातून चोरट्यांनी चोरी केल्याचे कोकरे यांना समजले याबाबतची तक्रार धुळे शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून धुळे शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button