Amalner

देशाचा कणा सावरला पण घरचा कणा सोडून पिऊन दरवाज्यात आडवा पडला महिला वर्गातुन संताप व्यक्त करत नाराजी

देशाचा कणा सावरला पण घरचा कणा सोडून पिऊन दरवाज्यात आडवा पडला महिला वर्गातुन संताप व्यक्त करत नाराजी

रजनीकांत पाटील

अमळनेर : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जनतेच्या जीवावर बितु नये म्हणून सरकार ची आर्थिक हानी सहन करत दळण वळण बंदीचा धाडशी आणि स्तुत्य निर्णय घेतला मात्र दुसरीकडे महसूल वाढवण्यासाठी दारू ची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे देशात कोरोना प्रादुर्भाव देशात वाढण्याचा धोका संभवतो या बाबत आज खुली झालेली दारूची दुकाने व बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या कोरोनाचा वाढता प्रभाव या मृत्यूची संख्या वाढत असतांना दुकानबाहेर लांब रंगाची स्थिती अत्यंत भयावय झाली. यात आपल्या घरातून गेलेला तळीराम दारुसाठी रांगेत गेला असता आज तो कोना कोणाच्या संपर्कात आला असावा या बाबत घरातील राहणाऱ्या नागरिकांना धास्ती वाटू लागली अमळनेर सारख्या शहरात कोरोना चांगलाच पसारा झाला असून ग्रामीण भागातील नागरिक आज दारू घेण्यासाठी शहरात जाऊ लागल्याने महिलांना धास्ती होत नाराजी व्यक्त होत आहे आज देशाचा कणा सुधरला व घरचा कणा सोडून आडवा पडला आज दारूच्या नशेत घरचा तळीराम दरवाज्यात येऊन आडवा पडला आहे.दारू मुळे महिलांनवरील होणारे अत्याचार,मुलांवर होणारे चुकीचे संस्कार अन उध्वस्त होणारे लाखो संसार अन कोरोना सारख्या आजाराचा वाढता प्रभाव असतांना दारूची दुकाने कशी काय उघडली या बाबत प्रश्न पडला असता महिलांवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button