बारामतीत स्थानिक महिलांनी पंचायत समिती येथे केले आक्रोश आंदोलन
प्रतिनिधी- आनंद काळे
बारामती- बारामतीपासून अवघ्या 2 किलोमिटर अंतरावर असणाऱ्या मेदड गावातील महिलांनी बारामती पंचायत समिती येथे जन अक्रोश आंदोलन केले त्यामुळे पंचायत समितीमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
मेदड येथील महिलांनी गट विकास अधिकारी श्री राहुल काळभोर ह्यांच्यासमोर पाढाच वाचला.ग्रामपंचायत मधील कर्मचारी फक्त एक तासापूरते येतात व त्यांचे काम उरकून निघून जातात.काही वेळेस तर ग्रामविकास अधिकारी गावातच येत नाही.गेली चार ते पाच दिवस गावात पाणी नाही,गावातील विकास कामे रखडलेली आहेत. अश्या तक्रारी गटविकास अधिकारी श्री राहुल काळभोर ह्यांच्यासमोर मांडल्या.
ग्रामप्रशासनाला विनंती अर्ज,निवेदन देऊन आम्ही थकलो आहोत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी मेदडमधील महिलांनी त्यावेळी केली.






