Rawer

म.रा.पत्रकार संघा तर्फे रावेरात पत्रकार भवन उभारणार, वाघोदा येथे सभेमध्ये पत्रकारांचा सामूहिक संकल्प…….

म.रा.पत्रकार संघा तर्फे रावेरात पत्रकार भवन उभारणार, वाघोदा येथे सभेमध्ये पत्रकारांचा सामूहिक संकल्प…….

मुबारक तडवी रावेर

Raver : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका ची बैठक आज मोठे वाघोदे श्री चक्रधर जेष्ठ नागरिक सभागृहात तालुकाध्यक्ष विलास ताठे यांच्या अध्यक्षतेखाली
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम संघटनेचे वाटचाल योग्य दिशेने होत असल्याने सर्व पत्रकार बंधूनी आनंद व्यक्त केला. यावेळी तालुका भरातील पत्रकार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील पत्रकार हा केवळ पत्रकार म्हणूनच कार्य करत नाही तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतो यावेळी पत्रकारावर होणारे अन्याय त्याचप्रमाणे समाजात होणारे अनुचित कार्य यास लगाम घालण्याचे कार्य करतो त्या अनुषंगाने रावेर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने रावेर शहरात पत्रकार भवन उभारन्याचे ध्येय निश्चित केले आहे.तसेच कार्यक्रमामध्ये पत्रकार संघटनेचे ओळखपत्र वाटप व केंद्र सरकारचे विमा योजनेचे कार्ड वाटप रावेर शहर कार्यकारणी जाहीर तसेच नवीन सदस्यांची नियुक्ती अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली . समाजात एक आदर्श निर्माण करावा असे यावेळी ठरवण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सचिव दिलीप भारंबे, सहसचिव जगदीश चौधरी, तालुका संघटक प्रदीप महाराज पंजाबी ,तालुका सहसंघटक विनायक जहुरे , सल्लागार सरदार पिंजारी, सहसल्लागार श्रीसंतोष बारी ,शहराध्यक्ष विनोद कोळी, प्रसिधी प्रमुख अनिल मानकरे ,
कोषाध्यक्ष रविंद्र महाजन,
योगेश पाटील ,प्रमोद कोडे , विनोद पाल्ले , , गिरीश नारखेडे ,प्रा.दिलिप सोनवणे, नजीर शेख ,संभाजी पाटील, आनंद भालेराव, प्रभाकर महाजन, अजिज शेख, शरीफ शेख ,संजय पाटील सर ,प्रशांत पाटील सर गिरीश नारखेडे सर, संभाजी पाटील, शहर सहसचिव,सह अनेक पत्रकार मंडळी हजर होते
सदर वेळी सूत्रसंचालन विनायक जहुरे तर प्रास्ताविक प्रदीप महाराज पंजाबी यांनी तर तालुका अध्यक्ष विलास ताठे यांनी मुख्य मार्गदर्शन केले आभार शरीफ शेख यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button