Amalner

?️ Big Breaking…शिरूड गावातील डॉक्टरचा मूर्खपणा .. गावाला लागले कोरोनाचे ग्रहण

शिरूड गावातील डॉक्टरचा मूर्खपणा .. गावाला लागले कोरोनाचे ग्रहण

रजनीकांत पाटील

अमळनेर तालुक्यातील काल संध्याकाळी आलेल्या रिपोर्ट मधे शिरूड येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला. सदर व्यक्ती अमळनेर शहरात राहत असुन त्यांचे मूळ गाव शिरूड येथे वैद्यकीय सेवा देत असुन दररोज अमळनेर येथुन ये जा करत असे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतने गावातील सर्व प्रॅक्टिस डॉक्टर यांना बोलावून सूचना देखील दिल्या होत्या की गावात जर कोणाला थंडी,ताप, घसा दुखणे असे काही लक्षण आढळून आल्यास तुम्ही त्यावर उपचार न करता आरोग्य सेविका यांना कळवावे अन्यथा अमळनेर शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठवावे या बाबत बैठक घेऊन देखील
लॉक डाउन काळात शासनाने व गावातील ग्रामपंचायतीने घालुन दिलेले नियम धाब्यावर बसऊन गावात बिनधास्त प्रॅक्टिस करत काही लोकांच्या घरी जाऊन तर काहींना स्वतःच्या दवाखान्यात बोलवत असे करित असताना, स्वतःला होणार त्रास ताप व खोकला याकडे संपुर्ण दुर्लक्ष केले व कोणालाही काही न सांगता आपल्या व्यवसाय सुरू ठेवला या प्रकारची लक्षणे आहे असे कळताच या बाबत गावातील आरोग्य सेविका व सरपंच पोलीस पाटील यांनी तातडीने धाव घेत सदर डॉक्टरला आपल्या राहत्या ठिकाणी अमळनेर शहरात घरात कॉरंटाईन राहण्यास सांगितलं नंतर काही फरक न जाणवल्याने त्यानां अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा काल संध्याकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला यानंतर मात्र संपूर्ण गावात खळबळ उडाली. B.D. O संदीप वायाळ व वैद्यकीय अधिकारी एस पी रनाळकर, तिलोत्तमा पाटिल यांनी भेट देऊन पुढिल कार्यवाही बाबत ग्रामपंचायत पदाधिकार्यांना सूचना दिल्या.

वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन सदर डॉक्टर ने कोणा कोणा वर उपचार व डॉक्टर कोणाच्या संपर्कात आलें त्या व्यक्तींच्या घरी जाऊन तपासणी विचापुस सुरू केली आहे यावेळी आरोग्य सहायक बी बी चौधरी, आरोग्य सेवक योगेश गावित,आरोग्य सेविका अनिता पाटील व आशा सेविका हजर असून गावातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात कॉरोटाईन करण्यात आले आहे अजून पुढील तपासणी सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button