आंबेगाव प्रिमीअर लीगचे प्रथम क्रमांक गवारी वाँरीअर्स डोण
पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे
आंबेगाव तालुक्यात सन्मानाची समजली जाणारी आंबेगाव तालुका प्रिमिअर लीग स्पर्धेत गवारी वॉरीअर्स डोण संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
रविवार दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झालेल्या फायनल मॅच मध्ये निघोटवाडी पेठ संघाला पराभूत करत हा विजय डोण संघाने मिळवला. प्रथम क्रमांकास ८१ ००० / – रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली .
प्रथम क्रमांक – गवारी वॉरिअर्स डोण,
द्वितीय क्रमांक – निघोटवाडी पेठ,
तृतीय क्रमांक – सुवर्णयुग मंचर,
चतुर्थ क्रमांक – विष्णू काका स्पोर्ट्स अवसरी यांनी मिळवला.
बक्षिस वितरण समारंभ विष्णूकाका हिंगे, विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पं . स . आंबेगावचे सभापती संजय गवारी व मान्यवरांच्या हस्ते झाला.
या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंबेगाव तालुका व विष्णू काका स्पोर्ट्स क्लब अवसरी यांनी आयोजित केल्या होत्या.
या वेळी तालुक्यातील उदयमुख खेळाडू पुरस्काराने डोण च्या स्वप्नील पारधी याला सन्मानित केले. तर मॅन ऑफ द मँच -शेरू लोहार व स्वप्नील पारधी यांना विभागून देण्यात आला .
उत्कृष्ट गोलंदाज गवारी वॉरिअर्स कर्णधार अशोक गवारी PSI ,उत्कृष्ट फलंदाज -सुर्याजी सावंत , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – रामा शिंदे,मॅन ऑफ द सिरीज – विशाल निघोट यांना बहुमान मिळाला .डोण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला सोपान पारधी यांने डोण संघान तर्फे चांगली गोलंदाजी करत दोन षटकात 05 धावा देत निघोटवाडी संघाचे 04 गडी बाद केले
त्याला चंद्रकांत पारधी, अमर गोरे यांनी चांगले प्रकारे साथ दिली निघोटवाडी संघाने डोण संघाला विजयासाठी फक्त 57 धावांचे माफक आव्हान दिले ही धावसंख्या डोण संघा तर्फे शेरू लोहार ने 14 चेंडूत 55 धावा करून 3.2 षटकात दिमाखदार विजय मिळवुन दिला संपूर्ण टुरनांमेट मध्ये अमर गोरे या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाजी केली तसेच अशोक गवारी याने उत्कृष्ट गोंलदांजी केली तसेच इतर सर्वानी चांगले क्षेत्ररक्षण करून डोण संघाचे विजयात मोलाचे सहकार्य केले.
यावेळी गवारी वॉरीअर्स संघाचे संघमालक संजय गवारी (सभापती ) संतोष कृष्णा गवारी सर , अशोक गवारी PSI , सुरेश गवारी मुख्याध्यापक, चंद्रकांत गवारी ( महाराष्ट्र पोलिस ) यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
पश्चिम विभागातील गवारी वॉरिअर्स संघाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आणि सदर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
यावेळी सामना पाहण्यासाठी व संघाला पाठींबा देण्यासाठी डोण गावचे समस्त ग्रामस्त सकाळ पासून हजर होते . यामध्ये आंबेगाव शिक्षक समितीचे अध्यक्ष ठकसेन गवारी , नटवरलाल गवारी, शंकर गवारी, सोमनाथ शेखरे, सगळे सर आदिवासी भागाचे युवानेते मारुती दादा केंगले तळेघरचे संदीप मोरमारे, रोहिदास, मोघा गवारी, विलास गवारी, नामदेव पारधी,गोविंद पारधी ,सिताराम गवारी विठ्ठल शेखरे , सोपान गवारी ,गणेश पारधी, धोंडू गवारी, बबन गवारी आदी नागरिक उपस्थित होते.






