अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमळनेर शाखेतर्फे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 66 वे राष्ट्रीय अधिवेशन थेट प्रक्षेपणाचे आयोजन अमळनेर शहरातील आय .एम . ए . सभागृहमध्ये करण्यात आले
रजनीकांत पाटील अमळनेर
अमळनेर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 66 वे राष्ट्रीय अधिवेशन हे रेशीम बाग , नागपूर येथे संपन्न होत आहे. परंतु कोरोना महामारी मुळे प्रत्येक कार्यकर्त्याला तेथे जाणे शक्य नसल्याने हे अधिवेशन संपूर्ण भारतात थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवले जात आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमळनेर शाखेतर्फे या थेट प्रक्षेपणाचे आयोजन अमळनेर शहरातील आय .एम . ए . सभागृह, गं. स. शाळा अमळनेर येथे करण्यात आले .ह्या कर्यक्रमाची सुरवात 2:30 ला सामुहिक गीता ने झाली. ह्या वेळी हितेश पाटील ह्या ने सूत्रसंचालन केले तर अधिवेशन प्रमुख प्रगती काळे हिने प्रस्तावना मांडली. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दिनेश नाईक व हितेश शाह होते. दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे, शहरमंत्री केशव पाटील,व अधिवेशन प्रमुख प्रगती काळे यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख अतिथीनी आपले मनोगत सादर केले. आभार प्रदर्शन हे मयूर शिंपी यांनी केले. व या नंतर थेट प्रक्षेपण नागपूरहुन 3 वाजेला सुरु झाले . या कार्यक्रमात अनेक प्राध्यपक, हियचिंतक, पूर्व कर्यकर्ते, विध्यार्थी, सहभागी झाले. या वेळी सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करण्यात आले. या कर्यक्रमाच्या यशासाठी अमळनेर सोशल मीडिया प्रमुख पवन सातपुते, प्रितेश पाटील, प्रथमेश निकुंभ, अमोल पाटील, हितेश पाटील, नरेन्द्र देसले, वैष्णवी पाटील, निकिता पाटील, अश्विन चौधरी, मयूर शिंपी,शहरमंत्री केशव पाटील, सहमंत्री वैभव पाटील, जिल्हा S. F. S. प्रमुख निलेश पवार, जिल्हा विध्यार्थीनी प्रमुख प्रगती काळे. ह्यांनी कष्ट घेतले, तर खा. शी मांडलाचे चेरमन प्रदीप अग्रवाल यांचे अनमोल सहकार्य लाभले.






