शिरिषदादा मित्र परिवाराने मानले व्हेंटिलर दिल्याबद्दल खा उन्मेष पाटील यांचे आभार
नूरखान
अमळनेर -येथील सध्या कोरोनाचे जे थैमान सुरू आहे त्या अनुशंगाने ग्रामीण रुग्णालयात व्हॅटिलेटर नसल्याने रुग्णाना जळगांव येथे रवाना करावे लागत होते. त्यास अनुसरून दमदार खासदार श्री उन्मेषदादा पाटील याच्या कडे आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीने ग्रामीण रुग्णालयातच व्हॅटिलेटर उपलब्ध व्हावे म्हणून मागणी लावून धरली होती.त्यास अनुसरून पी एम केअर फंडातून अमळनेर ग्रामीण रुग्णालय साठी तात्काळ 5 व्हॅटिलेटर उपलब्ध करून दिल्या बद्दल मा. आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांनी खासदार उन्मेषदादा पाटील यांचे भ्रमणध्वनी ने आभार मानले आहेत . मित्र परिवार आघाडीचे माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी, नगरसेवक धनुभाऊ महाजन, बाळासाहेब संदानशिव यांनी भेटून आभार मानले आहे.प्रसंगी पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करणदादा पवार देखील उपस्थित होते.






