Amalner

शिक्षकांचा सर्वेक्षणास नकार..अमळनेर येथे तहसिलदार यांना आर एम बी के एस आणि प्रोटान तर्फे निवेदन

शिक्षकांचा सर्वेक्षणास नकार..अमळनेर येथे तहसिलदार यांना आर एम बी के एस आणि प्रोटान तर्फे निवेदन

मा. तहसिलदार यांना ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’या मोहिमे अंतर्गत सर्वेक्षणात शिक्षकांना ड्युटी न देणेबाबत निवेदन आर.एम.बी.के.एस. आणि प्रोटान शिक्षक संघटना तर्फे देण्यात आले.

या निवेदनात कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉक डाउन कालावधीत ही राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासाठी राज्यातील शिक्षकांनी इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आवश्यक ती सर्व सेवा दिलेली आहे. चेकपोस्ट ड्युटी, सर्वेक्षण, राशन वाटप व अन्य जोखमीच्या जबाबदाऱ्या शिक्षकांनी शासन आदेशाप्रमाणे वेळोवेळी पार पाडलेल्या आहेत. या जोखमीच्या ड्युट्या बजावत असताना अनेक शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या परिस्थितीही शिक्षकांनी शासन आदेशाप्रमाणे आणि राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून प्रामाणिकपणे ,सेवाभावी वृत्तीने कोविड-१९ ड्युटी बजावलेली आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शासनाने शिक्षकांना त्यांचे शिक्षणाचे नियमित कामकाज करता यावे या साठी ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्याबाबत उपरोक्त शासन आदेशान्वये निर्देशित केलेले आहे.

शिक्षकांना आपले कामकाज नियमितपणे व सातत्याने पूर्ण करता यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कोविड १९ च्या संबंधीत कार्यासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना, कोविड १९ च्या संबंधित कामकाजातून मुक्त करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश शासनाने उपरोक्त दिनांक १७/०८/२०२० च्या आदेशाने दिलेले आहेत. असे असतानाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून उपरोक्त शासन आदेश डावलून शिक्षकांना “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत सर्वेक्षण ड्युटी दिली जात आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कारवाईचा दबाव आणून सर्वेक्षण करण्यास सक्ती केली जात आहे.
ही मोहीम पूर्णपणे लोकप्रतिनिधींनी नामनिर्देशित केलेल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आणि जनसहभागातून राबवायची योजना आहे.
अंगणवाडी सेविकांनाही या सर्वेक्षणाच्या ड्युट्या देण्यात येऊ नयेत.
वरील सर्व बाबींचा विचार करता”माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत शिक्षकांना कोविड-१९ सर्वेक्षण ड्युटी देण्यात येऊ नये. तसेच उपरोक्त शासन आदेशाचे पालन व्हावे ही विनंती.अन्यथा याबाबत सनदशीर मार्गांचा अवलंब करून या अन्यायकारी धोरणाचा संघटनेकडून विरोध करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन नायब तहसिलदार मा.बावने साहेब यांना देताना मिलिंद निकम, प्रा.विजय गाढे, नंदकिशोर पाटील, पुरूषोत्तम माळी, सुनिल मोरे, कमलाकर संदानशिव, किरण मोहिते, किशोर सोनवणे, सुनील करंदीकर, दीपक पाटील, दत्तात्रय सोनवणे, दिनेश मोरे, सुनिल सोनवणे,एस. एच. भवरे, एम. आर. तडवी, योगेश्वर पाटील, आ. बा.धनगर, सुनिल मोरे, अजय भामरे, प्रमोद सांळुखे आणि इतर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button