sawada

उपशिक्षक गजाला तबस्सुम कडून केला जात आहे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ मधील तरतुदींचा भंग?

उपशिक्षक गजाला तबस्सुम कडून केला जात आहे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ मधील तरतुदींचा भंग?

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर येथे जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्र.१ मध्ये गजाला तबस्सुम ही महिला उपशिक्षक असून आपण विद्यादान करण्याच्या क्षेत्रात आहोत याकडे थेट दुर्लक्ष करून सन २००५ पासून लागू लहान कुटुंबाची अतिरिक्त अटचा उल्लंघन केल्याने त्यांना प्रथम उपशिक्षक म्हणून सेवेत राहण्याचा अधिकार उरलेला नसताना उलट त्यांनी सदरचा प्रकार लपवून पंचायत समिती रावेर ते जिल्हा परिषद जळगांव सह विभागीय आयुक्त नाशिक विकास शाखा क्र.१ यांच्याकडून नाट्यमयरित्या आदर्श शिक्षक प्रस्ताव गटशिक्षण अधिकारी शैलेश दखणे व प्राथमिक शिक्षणाधिकारी अकलाळे यांनी पुढील कारवाईसाठी प्रस्तावाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे परिणामी आदर्श शिक्षक यादीत सदरील महीला उपशिक्षक यांचा नाव अखेर समाविष्ट झाला.असे शिक्षण क्षेत्रातील जाणकार सह नागरिकातून बोलले जात आहे.

तरी सदर महिला उपशिक्षक यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित बनलेला असून अप्रमाणिताच्या आधारावर मिळवलेला हा पुरस्कार देखील सारखा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.याबाबत जिल्हा परिषदेतील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जागृत नागरिकांनी तक्रारी देखील केलेले आहेत. यासंदर्भात वेळोवेळी सविस्तर बातम्या देखील प्रसिद्ध होत आहेत.मात्र अध्याप सदरील महिला उपशिक्षक विरुद्ध ठोस कारवाई न झाल्याने एका प्रकारे अधिकाऱ्यांकडून अभय प्राप्त महिला उपशिक्षक गजाला तबस्सुम हे सर्रासपणे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतुदींचा थेट भंग करून जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमात आदर्श शिक्षक म्हणून प्रशस्तीपत्र व सत्कार स्वीकारताना वृत्तपत्राच्या माध्यमातून दिसून येते.यामुळे असे निदर्शनास येते की, सदरील नियम व अट महिला उपशिक्षक यांना लागू नसेल तर ह्या बाबतीत तक्रारी प्राप्त असून ही धृतराष्ट्रची भूमिका घेणारे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाहीर स्पष्टीकरण करावा.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरी यासंदर्भात काही जागृत नागरिक जळगांव, नाशिक, मुंबई, पुणे येथील वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन लवकरच पुराव्यानिशी तक्रार देखील दाखल करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button