चिमूर तालुक्यातील वीज बिल माफ करा— अविनाश भाऊ अगडे यु, कांग्रेस,लोकसभा महसचिव
चिमूर प्रतिनिधी–ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर– कोरोना 19 मध्ये वीज वितरण कंपनीने कुठले ही मिटर रीडिंग 3 महिने घेतली नाही व जुन्या रीडिंग नुसार ग्राहकांना अवाढव्य विदुयत बिल पाठवले आहे कुणाला 5हजार ते कुणाला 10हजार तर कुणाल 15 हजार कोविड 19 मध्ये सर्व लोकांचे काम धंदे रोजगार बंद असून वीज वितरण कंपनीच्या वतीने पाठव न्यात आलेले बिल हे परवडण्यासारखे नाही आणि येवडी रक्कम सुध्दा भरणे सामान्य जनतेला परवडणार नाही करिता वीज कंपनीने या मध्ये शिथिलता द्यावी किंवा 3 महिन्याचे वीज बिल माफ करावे जेणेकरून सामान्य जनतेला फटका बसणार नाही आज लोकांन कडे कुठल्याही परिस्थितीत बिल भरण्यासाठी पैसे नाही वरून शेतीच हंगाम सुरू झालेला आहे शेतकरी बांधवांनी शेतीला पैसे लावावे की वीज बिल भराव आज सामान्य जनतेचा विचार करून वीज मंत्र्यांनी 3 महिन्याचे वीज बिल माफ करावे या अशी मागणी युवक कांग्रेस लोकसभा महसचिव अविनाश भाऊ अगडे यांनी केली आहे जर वीज बिल माफ झाले नाहीतर लोकांनी वीज बिल भरू नये असे सुध्दा आव्हान त्यांनी केले आहे.






