खिर्डी बु.येथे पशुवैद्यकीय व्हॅनचे पूजन
प्रविण शेलोडे खिर्डी
खिर्डी : खिर्डी बु येथे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या पशुस्वास्थ योजने अंतर्गत पशुवैद्यकीय व्हॅनचे पूजन पंचायत समिती सदस्य दीपक पाटील व खिर्डी बु चे सरपंच किरण कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.खिर्डीचे उपसरपंच पती घनश्याम पाटील ,ग्रामपंचायत सदस्य योगेश जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी वडजे, कृषी सेवक एस. पी.तायडे, किरण नेमाडे वाघाडी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील ,व ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.या योजने अंतर्गत आजारी पशुंवर शेतकऱ्यांच्या दारात उपचार होणार आहे . तसेच रोग प्रतिबंधक लसीकरण, पशु आहार व आरोग्याबाबत तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन होण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विवीध योजनांची माहिती मिळविण्यास मदत होईल.






