Ratnagiri

लाचखोर मुख्याध्यापिकाला सेवेतून बडतर्फ करा, बिरसा क्रांती दलाची मागणी शिक्षकाकडून पैसे मागणीचा आॅडीओ होतोय वायरल.

लाचखोर मुख्याध्यापिकाला सेवेतून बडतर्फ करा, बिरसा क्रांती दलाची मागणी शिक्षकाकडून पैसे मागणीचा आॅडीओ होतोय वायरल.

रत्नागिरी : लाचखोर मुख्याध्यापिका श्रीम .अर्चना रामचंद्र पाटील( हिरवे) के.बी.हिरवे विद्यालय शेवरी तालुका माण जिल्हा सातारा यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे ऑडीओ पुराव्यानिशी केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, श्री. भास्कर लहू बागूल,शिक्षक के.बी.एन .हिरवे विद्यालय शेवरी तालुका माण यांचा पगार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अर्चना रामचंद्र पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा माणला पञ देऊन माहे.नोव्हेंबर 2019 पासून दिनांक:22/01/2021 पर्यंत जाणीवपूर्वक अडवून आर्थिक कोंडी करून पिळवणूक केली आहे. याबाबत बिरसा क्रांती दल संघटनेने आपणास निवेदन दिले होते. त्या तक्रारीची मा.शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांनी दिनांक:22/01/2021 रोजी सखोल चौकशी चौकशी केली आहे.माञ पुढील कार्यवाही केलेली दिसत नाही. त्यानंतर
त्या तक्रारीच्या अनुषंगाने सुडबुद्धीने मुख्याध्यापिका श्रीम. अर्चना पाटील ह्या भास्कर बागूल शिक्षकास शाळेत हजर करून घेत नाहीत, हजेरीपञकावर सही करू देत नाहीत व जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
तसेच मला कमी समजता काय? तुम्हाला अटकावयला 1 मिनीटं भी लागणार नाही. मला पैसे द्यायचे, मी तुम्हाला पगार दिला. त्याचे पैसे द्या. तुम्हाला पगार दिल्यापासूनचे पैसे द्या. मी मुख्याध्यापक आहे,मी लेडीज आहे,माझ्या घरात वकील आहेत, मी तुमच्यावर काहीही करू शकते,तुमचे तुकडे करून नंदुरबार ला पाठवीन, म्हणून मला पैसे द्याच,अशी धमकी दमदाटी करून पैसे उकडण्याचे काम करत असतात. पगारातले पैसे( लाच) जबरदस्तीने मागत असल्याचा पुरावा संघटनेस प्राप्त झाला आहे.
सदर मुख्याध्यापिका पैसे लाच मागून शिक्षण विभागाचे नाव बदनाम करत आहे, शिक्षण विभागाला काळीमा फासत आहे. धमकी, दमदाटी करणारी,जीवे ठार मारण्याची धमकी देणारी ,जबरदस्तीने पैसे ऊकडणारी व मागणारी व्यक्ती शिक्षणासारख्या पवित्र श क्षेञाला कलंकित करणारी असून धोकादायक आहे. म्हणून श्रीम. अर्चना रामचंद्र पाटील मुख्याध्यापिका के.बी. हिरवे विद्यालय शेवरी तालुका माण जिल्हा सातारा यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, हीच नम्र विनंती.
अन्यथा बिरसा क्रांती दल संघटना आपल्या प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल. याची नोंद घ्यावी. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी सातारा यांच्या कडे केली आहे. त्यामुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबळ माजली आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी सदर मुख्याध्यापिकेवर कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button