?️ सावधान..धुळ्या पर्यंत पोहचला कोरोना धुळे येथे दोन कोरोना सकारात्मक रुग्ण…
श्रीराम परदेशी
धुळे:
धुळे शहराला चारही बाजूंनी चौफेर सीमेलगतच्या जळगाव, नाशिक, मालेगाव, शिरपूर सीमेलगत सेंधव्यापर्यंत आणि साक्री- नवापूर सीमेलगतच्या सुरतपर्यंत पोचलेलया कोरोना ने प्रवेश केला आहे त्यामुळे धुळे जिल्ह्याची आणि प्रशासनाची झोप उडाली आहे .
आज धुळे जिल्ह्यात दोन “कोरोना पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पैकी एका 60 वर्षीय प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला असून 22 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना सावध राहण्याची वेळ आली आहे. मालेगाव आणि साक्री परिसरातील दोघे कोरोनाग्रस्त आढळल्यावर वैद्यकीय यंत्रणा कार्यन्वयीत झाली आहे.
धुळे पोलिसांनी दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांची राहण्याची जागा “सील’ करण्याची कार्यवाही केली आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेने धुळे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री बारापासून रविवारी पहाटे पाचपर्यंत आरोग्य सेवा वगळता पूर्णतः संचारबंदी, “लॉक डाऊन’चा आदेश बजावला आहे. शुक्रवारी साडेसहापर्यंत सरकारी यंत्रणा आणि हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रुग्णालय दैनंदिन कामकाजात गुंतलेले असताना दोन “कोरोना पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळल्याची माहिती पुढे येताच वैद्यकीय व सरकारी यंत्रणा सजग होऊन कार्यरत झाली. साक्री येथील 60 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे, तर मालेगाव येथील 22 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू आहे. साक्री येथील कामगार प्रौढ गुरुवारी (ता. 9) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर तो तपासणी अहवालाव्दारे कोरोना बाधित असल्याचे समोर आले तर संबंधित तरुणी मालेगाव येथून धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे.






