Mumbai

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ..!न्यायालयीन कोठडी रद्द करत ईडीच्या कोठडीत रवानगी..!

मा गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ..!न्यायालयीन कोठडी रद्द करत ईडीच्या कोठडीत रवानगी..!

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.आता ईडीनं थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसांच्या ईडी कोठडीत केली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केला व अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सत्र न्यायालयाने दिली होती.बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम त्यांच्या स्विय सहायकास दिली. हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button