महाराष्ट्र सोलापूर जिल्हा भीमा सहकारी साखर कारखान्याची एफ आर पी रक्कम सर्व उदापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार!
रफिक अत्तार सोलापूर
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील नावाजलेल्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील अग्रमानांकित अशा भीमा सहकारी साखर कारखान्याची 2018 -19 मधील सर्व शेतकऱ्यांची सर्व राहिलेली एफ.आर पी रक्कम दिनांक 14 डिसेंबर पासून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा केली जाणार असल्याचे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कारखाना व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यावर ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 2018 -19 मध्ये आपला ऊस गाळपास आणला होता त्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याचे चेअरमन माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक, यांनी दिलासा दिला आहे. भीमा सहकारी साखर कारखाना हा नेहमीच सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे व सभासदांचे व कामगारांचे हित जोपासणारा कारखाना म्हणून नावारूपाला आलेला आहे कारखान्याचे चेअरमन खा. धनंजय ऊर्फ मुन्ना साहेब महाडिक यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग करण्याचे ठरवले असल्यामुळे सर्व भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये व सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.






