Solapur

मुल्ये व्यक्तिचे वर्तन नियंत्रित करतात..प्रा.डॉ. एम.व्ही. मते

मुल्ये व्यक्तिचे वर्तन नियंत्रित करतात..प्रा.डॉ. एम.व्ही. मते

असे मत केंद्र अरण तालुका माढा च्या आॅनलाईन शिक्षण परिषदेत व्यक्त केले

शिक्षण प्रक्रियेतील अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, प्रशिक्षण, संशोधन यामध्ये मुल्य जोपासने आवश्यक. मुल्यातून व्यक्तिचे वर्तन नियंत्रित होते असे मत केंद्र अरण च्या शिक्षण परिषदेत बार्शी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ.एम.व्ही. मते यांनी व्यक्त केले. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक डॉ. विलास काळे यांनी केले. शिक्षण परिषदेस केंद्र अरण मधील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. प्रा. डॉ. एम.व्ही. मते यांनी मुल्य शिक्षण व व्यक्तीमत्व विकास यावर सविस्तर मार्गदर्शन केले. माणसाचे वर्तन कसे असावे. मुल्ये आत्मसात करावी लागतात. बौद्धिक, नैतिक व सौंदर्य विषयक मुल्ये महत्वाची आहेत. शिक्षण म्हणजे व्यक्तीमध्ये विशिष्ट दिशेने वर्तन बदल म्हणजे शिक्षण होय. अनुभवानुसार आपल्या वर्तनात बदल करणे. शिक्षणातून तीन पातळ्यांवर विकास घडून येतो. बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक शिक्षण होय. शिक्षण म्हणजे डोक्यात कोंबले जाणारे नसून गोंधळ उडवून देणारे ज्ञान नव्हे तर जीवनाला दिशा मिळणे आणि चारित्र्य निर्मिती करणे होय. केवळ बौद्धिक माहिती भरावी म्हणजे शिक्षण नव्हे तर विविध प्रवृत्तींना योग्य असे सुसंस्कृत वळण लावणे म्हणजे शिक्षण. साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षणाचा प्रारंभ देखील नवनिर्माण यांचा परिपूर्ण विकास करून व्यक्ती मधील सर्व सर्वोत्तम अभिव्यक्ती करणे म्हणजे शिक्षण. शिक्षण सर्वांगीण विकासाचा आधार. शिक्षण म्हणजे विधायक व सर्जनशील व्यक्तीमत्त्वाची निर्मिती म्हणजे शिक्षण. माहिती देणे, कौशल्य निर्मिती करणे, मूल्य शिक्षण का गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वैयक्तिक मूल्ये, सामाजिक मूल्ये, राष्ट्रीय मूल्य संवर्धनासाठी, लोकशाही मूल्य संवर्धनासाठी विविध प्रकल्प व उपक्रम, मुल्य शिक्षणात शिक्षकाची भूमिका याविषयी प्राध्यापक डॉ. महादेव मते यांनी सखोल मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेसाठी वेळापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. इरफान इनामदार यांनी निपुण भारत अंतर्गत अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती, पायाभूत शिक्षण, रिड टु मी ॲप्लिकेशन सह विविध शैक्षणिक अॅपलिकेशन व शैक्षणिक कामकाजाबद्दल मार्गदर्शन केले.
ग्यानप्रकाश फाऊंडेशन पुणे चे समन्वयक संभाजी रोडे यांनी शाळा व्यव स्थापन समिती भूमिका, कर्तव्य, जबाबदारी, शाळा विकास आराखडा निर्मिती, पायाभूत शिक्षण, शिक्षणामध्ये पालकांची भूमिका या विषयी मत व्यक्त केले.
विकास शेळके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राऊत वस्ती यांनी निपुण भारत अंतर्गत मराठी विषयाच्या मूलभूत क्षमता, पायाभूत शिक्षण, अध्ययन निष्पत्ती, शैक्षणिक साहित्याचा वापर या विषयी मनोगत व्यक्त केले.
अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांनी प्रशासकीय कामकाजामध्ये स्टुडंट पोर्टल, दिक्षा अॅपलिकेशन, स्वाध्याय उपक्रम, विद्यार्थी आधार नोंदणी, ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्या पर्यंत पोहचवणे, विविध परिपत्रके, विविध शैक्षणिक अॅपलिकेशन, विविध ऑनलाईन शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेत तानाजी इंगळे, कल्पना घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार नवनाथ शिंदे यांनी मानले. शिक्षण परिषदेसाठी तांत्रिक सहाय्य डॉ. विलास काळे, दिपक काळे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button