Amalner

Amalner: बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी..!मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करा..भावनिक साद घालत घेतला जगाचा निरोप..!

Amalner: बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी..!मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करा..भावनिक साद घालत घेतला जगाचा निरोप..!

अमळनेर दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून सोबतच आत्महत्या करणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यात घडली असून दिनेश ठाकूरदास पंजवाणी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.माझ्या मुलाचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे, माझ्या मित्रांनो आपण शक्य तेवढी मदत करावी, अशा भावनिक शब्दात चिठ्ठी लिहून या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. शिवाय दोनजण पैशांचा तगादा लावत असल्याने त्रासून आत्महत्या करत असल्याचेही चिठ्ठित नमूद आहे.

जितेंद्र चौधरी (पारोळा) व रुग्णवाहिका चालक महेश सैंदाणे (रा. जानवे ता.अमळनेर) अशी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे आहेत. दिनेश पंजवाणी याने लिहिलेल्या चिट्ठीतील मजकूर असा ‘मैं दिनेश पंजवाणी अपने होश आवास मे लिख रहा हूँ. मैं बेरोजगार हो गया हूँ, मुझे कोई काम नही मिल रहा है और शर्म की बात है की मेरी बीबी काम करके घर चलायेगी, मुझे दो लोग पैसे के लिये बहोत तंग कर रहे है! जितू चौधरी, महेश सैंदाणे ये लोग मुझे धमकी दे रहे है और मेरे पास घर चलानेको पैसे नही है ये दोनो को कहासे दु, इसलिए तंग होकर मैं आत्महत्या कर रहा हूँ. ये दोनो के मोबाईल नंबर मेरे मोबाईल मे है.

याचबरोबर, सुसाईड नोटच्या खाली मेरे जीएस ग्रुप के दोस्तो के लिए…माझे सर्व चड्डी मित्र आपल्याला माझी शेवटची कळकळीची विनंती आहे की, माझा मुलगा वरुण याचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे. तरी आपल्या ग्रुपकडून शक्य तेवढी मदत करावी. असेही चिठ्ठित म्हटले आहे. दिनेशच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button