Bollywood

?️ प्यार से डर नहीं लगता साब “थप्पड” से लगता है…”थप्पड” चित्रपट… पुरुषप्रधान संस्कृतीच्या कानात मारलेली “थप्पड”

?️ बॉलिवूड

प्यार से डर नहीं लगता साब “थप्पड” से डर लगता है…”थप्पड” चित्रपट… पुरुषप्रधान संस्कृतीच्या कानात मारलेली “थप्पड”

जे खरे “मर्द”असतात ते स्त्रीला मारत नाहीत आणि ज्यांना आपल्या “पुरुषत्वावर” शंका असते ते स्त्रीला मारल्या शिवाय राहत नाहीत…

प्रा जयश्री दाभाडे

22 फेब्रुवारी 2020 ला थप्पड हा तापसी पन्नू अभिनित अभिजित सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेली सामाजिक आणि कौटुंबिक हिंसाचार दाखवणारा चित्रपट आहे.
‘थप्पड’ चित्रपटाचं परीक्षण नाही. फक्त चित्रपटातून काही प्रश्न निर्माण झाले.मी सातत्याने गेली काही वर्षे women study (महिलांचा इतिहास) हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यासत आहे. voilence against women (VAW) या विषयावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी व्याख्यानेही दिली आहेत. सामाजिक हिंसाचारा बरोबरच कौटुंबिक हिंसाचार हा तितक्याच वेगाने आणि बिनदिक्कत पणे वाढत आहे.

महिलांसाठी कार्य करीत असताना हे प्रश्न मला भेडसावत राहिले, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत त्या प्रश्नांनी मनात काहूर मन अस्वस्थ होत.अश्या अनेक कौटुंबिक समस्या दूर करताना समुपदेशन करताना पहिला प्रश्न कौटुंबिक हिंसाचाराचा समोर येतो.यावेळी काय झालं मारलं तर नावऱ्यानेच मारलं ना ? का परक्याने मारलं/त्यात काय एव्हढं विशेष?स्त्री आहे तिने चुपचाप मार खाऊन घ्यावा?असे प्रश्न प्रत्येक वेळी समोर आले. अनेक वेळा उच्चशिक्षित, चांगल्या पदां वर कार्यरत असणाऱ्या महिला देखील कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात.

? मारहाणीचा इतिहास जुना

देशाच्या इतर कुटुंबासारखंच आमच्या कुटुंबातही अशा प्रकारच्या मारहाणीचा इतिहास जुना आहे. ही नवीन गोष्ट नाही आणि फार मोठी गोष्टही नाही.

आमच्याकडे मारहाणीचा इतिहास खुप जुना तर आहेच परंतु पुरुष प्रधान संस्कृती जपण्याचे ते एक हत्यार आहे. त्यावर आमच्या घरच्या बायका फक्त हसून पडदा टाकत आहेत.

वरणात मीठ कमी झालं तर कानशिलात लगावली. बाईने उलट उत्तर दिलं तर दिली थोबाडीत. कोणतीही गोष्ट पुरुषांच्या मनाप्रमाणे झाली नाही तर थप्पड ठरलेलीच.मार का खातो आहोत याचं कारणही अनेक वेळा स्त्रियांना माहीत नसतं.

पुरुषांना तो अधिकार होता. त्याला तो दिला होता आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्याने सुरक्षित राखला होता. कानशिलात लगावणारे प्रश्न विचारत नाहीत. कानशिलात खाणाऱ्यांनीही प्रश्न विचारला नाही, कारण प्रश्न विचारला तर जाणार कुठे?

? कानशिलात लगावली? जाणार कुठे?मोठा प्रश्न

NCRB च्या आकडेवारी नुसार प्रत्येक 20 व्या मिनिटाला एक स्त्री कौटुंबिक हिंसाचारा ला बळी पडते, प्रत्येक घरात कानशिलात लगावली जात आहे, मात्र एका थपडेमुळे घरातली महिला निघून गेली तर ती जाणार कुठे?

चित्रपटाच्या पहिल्या भागात उत्तम संसार आणि सुखी कुटुंब दाखविताना जागोजागी रुढीवादी पुरुष प्रजासत्ताक व्यवस्थेचे पालन करणारे प्रसंग आहेत. एकट्या बाईला पाहिल्यावर प्रत्येक पुरुष संधी मिळायच्या प्रतीक्षेत असतात. प्रत्येकाच्या मुखी एकच प्रश्न आहे- तू बाई आहेस, ते ठीक आहे. तू कोणत्या पुरुषाची बाई आहेस? जी बाई पुरुषाविना आहे, त्या बाईला प्रत्येक पुरुष आपल्याचा बापाचा माल समजतो.

दुसऱ्या भागात मात्र थप्पड खाल्या नन्तर अमृताचा प्रवास विश्वसनीय आहे.या प्रवासात तिने पुरुष प्रधान संस्कृतीलाच जोरदार कानशिलात लगावली आहे.

? महिला मारहाण का सहन करत आहेत?

पत्नी म्हणून दर्जा काढून घेतला तर रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. परिस्थिती बदलली तर कानशिलात लगावायला जराही वेळ लागत नाही. सगळ्या घरातल्या माणसांसमोर, गोतावळा जमलेला असताना तुमच्या चेहऱ्याला तडाखा बसू शकतो. गाल सुजला तर बर्फाने शेका. थोड्या वेळात सगळं काही ठीक होईल.

खरा प्रश्न हा नाहीये की महिला मार खात आहेत हा नाही. महिला का मार खात आहेत? हा प्रश्न आहे. महिलांना अशा माराला सामोरं जावं लागणार नाही यासाठी काय करणं अपेक्षित आहे. काय करावं की जेणेकरुन त्यांना भीती वाटणार नाही, त्या पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहतील, अन्य कोणापेक्षाही त्या स्वत:ला सुरक्षित राखू शकतील, अन्य कोणापेक्षाही स्वत:चा सन्मान त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल.

प्रश्नांची उत्तरं चित्रपटात आहेत. ट्रेलर किंवा प्रमोशनचे व्हीडिओ पाहून वाटतं, हा चित्रपट अमृताने खाल्लेल्या थपडेविषयी नाहीयेच. हा चित्रपट वडिलांबद्दल आहे. हा चित्रपट त्या घराबद्दल आहे, जिथे तिचा जन्म झाला, मोठी झाली, जिथे तिचे वडील राहातात, आई आहे.

पुरुष अधिकार गाजवतो तर की स्वत:चं मीपण सोडून देतो? पुरुष हात उचलतो तो हात रोखणे गरजेचे आहे की गालावर पुन्हा पुन्हा थप्पड लगावून घेणे?

खरंतर हा चित्रपट हिंसेबद्दल नाही. हा चित्रपट मुलगी आणि बापाच्या नात्याबद्दल आहे. हा चित्रपट तुमच्या मुलीबद्दल आहे, जे आता हे वाचत आहेत. अशी मुलीबद्दल आहे जिचे तुम्ही बाप होऊन आनंदी व्हाल.

हो, एक थोबाडीत पुरेशी आहे. मात्र ती मारु शकत नाही.

आता एक थपडेसाठी मुली नाती तोडू लागल्या तर या देशातले नातेसंबंध शाबूत राहणं अवघड होईल. ही भीती तुमचीही आहे, ज्यावर चित्रपटाने बोट ठेवलं आहे आणि त्यामुळेच पुरुष प्रधान समाजाला कानकोंड वाटू लागलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button