? Crime Dairy…. प्रेयसीचा आपल्या पत्नीच्या मदतीने विवाहित प्रियकराने केला होता खून…5 वर्षानंतर न्यायालयाने केली शिक्षा….
दोन्ही पती पत्नीने गळा चिरून हत्या केली आणि तिचा मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून झाले होते फरार…
सलमान मुल्ला
उस्मानाबाद येथे 2015 मध्ये तरुणीच्या हत्या प्रकरणात प्रियकरासह तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. पुणे आणि नंतर नागपूरला वास्तव्य असलेल्या तरुणीची गळा चिरून हत्या झाली होती. तरुणीच्या विवाहित प्रियकराने आपल्या पत्नीच्या मदतीने ही हत्या केल्याची घटना डिसेंबर 2015 मध्ये घडली होती. दोन्ही आरोपींनी तरुणीचागळा चिरून हत्या केली आणि तिचा मृतदेह पोत्यात घालून विहिरीत फेकून फरार झाले होते.
आरोपी खून केला नन्तर 5 ते 6 महिने फरार होते. खून झालेल्या तरुणीने खून होण्याच्या काही दिवस अगोदर ऑनलाइन टॉप खरेदी केला होता. या माहिती वरून पोलिसांनी तपास करत.हा टॉप ज्या ग्राहकाच्या नावाने खरेदी केला होता याचा शोध घेतला प्रकाश चाफेकर या व्यक्ती चा शोध लागला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली आणि हा खुनी पोलिसांच्या हाती लागला. मयत तरुणी व विवाहित प्रकाश यांच्यात पुण्यात असताना प्रेमसबंध होते. चाफेकरच्या घऱी नागपूरला हे प्रकरण समजतलयानंतर दोघांमधे वाद सुरू झाले होते. तरुणी ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर प्रकाशने पत्नी ,मेहुणा यांच्या मदतीने खुनाचा कट रचला आणि उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली शिवारात तरुणीचा गळा चिरून खून केला व प्रेत विहिरीत फेकून दिले.
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी ताब्यात घेत पुरावे गोळा केले आणी न्यायालया समोर हे पुरावे सादर केल्यानंतर 5 वर्षांनी उस्मानाबाद सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी थर्वतब जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन यांच्या मार्गदर्शन नात आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोड यांच्या नेतृत्वाखाली तपास केला व आरोपीला कृत्याची शिक्षा मिळाली या उत्कृष्ट कामगिरी मुळे उस्मानाबाद पोलिसांचे कौतुक होत आहे.






