Maharashtra

देवळाली कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला कोरोना किट वितरण

देवळाली कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला कोरोना किट वितरण

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे

ख्रिस्ती बांधवांच्या नाशिक सोशल सर्व्हिस यांच्या सोसायटीच्या वतीने तर नाशिक धर्मप्रांताचे धर्मगुरू बिशप लुर्ड्स डेनियल यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड -१ ९ के अर सेंटर असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलमधील डॉक्टर्स , नर्सेस व स्टाफ यांच्यासाठी ५० पीपीई किटचे वितरण येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात पार पडले . याप्रसंगी करोना विषाणूला हरविण्यासाठी प्रत्येक घटकाने डॉक्टर्स व प्रशासनाला सहकार्य केल्यास हे युद्ध आपण जिंकू , असा विश्वास खा . हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला . यावेळी नगरसेवक सचिन ठाकरे , तानाजी करंजकर , फादर नॉलेस्को गोम्स , फादर विशाल त्रिभुवन , मार्टिन फर्नाडिस , अक्षय गवळी , जॉवेन फर्नाडिस आदी उपस्थित होते . नाशिक सोशल सर्व्हिसेस सोसायटीचे संचालक फादर नॉलेस्को गोम्स यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याकडे हे ५० पीपीई किट सुपूर्द केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button