कवडू लोहकरे यांना स्टार महाराष्ट्र पर्यावरण गौरव पुरस्कार जाहीर
बल्लारपूर येथे पार पडणार पुरस्कार वितरण सोहळा
ज्ञानेश्वर जुमनाके
चिमुर— चिमुर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाची चळवळ तयार करुन जनतेच्या ह्दयात पर्यावरण संवर्धनाचे बिज रोवणारे पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांना २०२०-२०२१ या वर्षी चा महाराष्ट्र स्टार पर्यावरण गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
रहिकवार ब्रदर्स फिल्म प्राँडक्शन -मुंबई यांनी यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची दखल घेत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, प्लास्टिक मुक्त शहर अभियान, ऐतिहासिक वारसा संवर्धन, सर्प जनजागृती या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबाबत पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांना या वर्षी चा स्टार महाराष्ट्र पर्यावरण गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. बल्लारपूर येथील कार्यक्रमात पार पडणार पुरस्कार वितरण सोहळा.
पर्यावरण संवर्धन समिती भिसी, पर्यावरण संवर्धन समिती चिमुर, पर्यावरण संवर्धन समिती नेरी यांनी पुरस्कार मिळाल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले.






