केमिस्ट & ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे गरजू गरोदर मातांना ब्लॅंकेटचे वितरण
चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके
केमिस्ट & ड्रगीस्ट असोसिएशन चिमूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य केमिस्ट & ड्रगीस्ट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री. मुकुंदजी दुबे यांच्या वाढदिवस प्रित्यर्थ आज दि.२५ जानेवारी ला उपजिल्हा रुग्णालय चिमूर इथे वैद्यकीय अधिकारी मा.डॉ. अश्विन अगडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू गरोदर मातांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.
ब्लॅंकेट वितरण करतेवेळी चिमूर तालुका केमिस्ट & ड्रगीस्ट असो. चे चिमूर तालुका अध्यक्ष मा. अजयभाऊ चौधरी, चिमूर तालुका सचिव मा. स्नेहदीप खोब्रागडे, मा.अभय धोपटे, मा.देवभाऊ कडवे,मा.प्रकाशजी जयस्वाल, मा. गंगाधरजी नेउलकर, मा. हेमंत चरपे, मा.दिलीप गराटे, मा. श्रीरंग भार्गव,मा. प्रमोदजी जाधव,मा.दादाराव तळवेकर आदि उपस्थित होते.






